Take a fresh look at your lifestyle.

हॅपी बर्थडे स्टायलिश हिरो अल्लू अर्जुन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेलगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन याचा आज ३८वा वाढदिवस आहे. अल्लू अर्जुन हा टॉलीवूड इंडस्ट्रीचा स्टायलिश सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. अल्लूची फॅन फॉलोइंग संपूर्ण जगभरात आहे. तो कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. आज जगभरातून कित्येक चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.

लवकरच अल्लू अर्जुनाचा आगामी चित्रपट पुष्पा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना हि प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी संध्याकाळी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये अल्लू अर्जुन फूल अ‍ॅक्शन मुडमध्ये दिसत आहे. या सिनेमात अल्लूला एक वेगळी स्टाईल मिळत आहे, जी त्याच्या आधीच्या सर्व पात्रांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे अल्लूला या स्टाईलमध्ये पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अल्लूने गंगोत्री या तेलगू चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर अनेक चित्रपटांतून अभिनय करीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ६ मार्च २०११ साली अल्लूची लग्नगाठ स्नेहा रेड्डी सोबत बांधली गेली. या विशेष म्हणजे त्यांचा हा विवाह प्रेमविवाह आहे. लाखो मनांवर राज्य करणाऱ्या अल्लूच्या मनावर फक्त आणि फक्त स्नेहाच राज्य करते. या दोघांविषयी खास गोष्ट म्हणजे स्नेहा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी संबंधित नसली तरीही ती अल्लूच्या करीअरला चांगल्या प्रकारे समजून घेते आणि त्याला समर्थन देते.

त्याचबरोबर, अल्लू सद्धा एका प्रसिद्धीचा एक भाग असला तरीही त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर कधीही त्याचा परिणाम होऊ दिला नाही. त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. यांना अयान आणि अरहा ही दोन मुले आहेत. हम दो, हमारे दो अशी अल्लूची एक हॅप्पी फॅमिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.