Take a fresh look at your lifestyle.

स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन मराठमोळ्या श्रेयस तळपदेला भेटणार; जाणून घ्या कारण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही आठवड्यांपासून बॉक्स ऑफिस आणि ओटीटीवर एकच चित्रपट गाजतोय आणि तो म्हणजे पुष्पा. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा- द राइज’ चित्रपटाने लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. अगदी समीक्षकदेखील याला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. आतापर्यंत हा चित्रपट तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून प्रत्येक भाषेत त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर यशस्वीपणे घोडदौड केलेल्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयसने त्याचा आवाज दिला आणि चित्रपट सॉलिड हिट गेला. याची भुरळ अगदी अल्लू अर्जुनलादेखील पडली मग काय? अल्लूने श्रेयसच्या भेटीची ईच्छा वर्तवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

सध्या सोशल मीडियावर पुष्पा चित्रपटातील गाण्यांवर इतके रिल्स बनत आहेत कि ट्रेंडिंगवर फक्त पुष्पा. याशिवाय सतत चर्चेत असलेल्या चित्रपटामुळे कलाकार देखील खुश आहेत. दरम्यान माध्यमांशी बोलताना अल्लू अर्जुनने मराठी अभिनेता श्रेयस तळपदेचे आभार मानले आहेत. शिवाय त्याला भेटण्याची ईच्छादेखील व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ श्रेयस तळपदेने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. “श्रेयस, या चित्रपटासाठी तू जो छान आवाज दिलास त्यासाठी मनापासून तुझे आभार. लवकरच आपण भेटुयात. आज ऑन कॅमेरा मला तुझे आभार मानायचे आहेत. ‘पुष्पा’साठी तुम्ही घेतलेल्या मेहनतीसाठी खूप आभार”, असं अल्लू अर्जुन यात म्हणताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

‘पुष्पा- द राईज’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. यानंतर १४ जानेवारी २०२२ रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट हिंदी भाषेत रिलीज झाला. या चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा अभिनय आणि डायलॉगबाजी सगळंच कसं खतरनाक. त्यामुळे चित्रपट प्रत्येक भाषेत हिट झाला आहे. या चित्रपटाचे कथानक लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहेत. तसेच एक मजूर जेव्हा संघनायक होतो तेव्हा काय होतं हे या चित्रपटात दर्शविले आहेत. चित्रपटातील गाणी आणि डायलॉग चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.