Take a fresh look at your lifestyle.

स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठापुरामुलू’ लवकरच हिंदीत येणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने जगभरात आपला असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर जवळपास ३०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई पुष्पाने केल्यांनतर आता अल्लू अर्जुनाचा आणखी एक गाजलेला चित्रपट लवकरच हुंडी भाषेत रिलीज होणार आहे. ‘पुष्पा’च्या लोकप्रियतेचा फायदा घेत ‘अला वैकुंठापुरामुलू’च्या निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदीत डब करण्याचा निर्णय घेतला आहे. अल्लू अर्जुनचा हा सुपरहिट चित्रपट हिंदीमध्ये २६ जानेवारी २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ‘अला वैकुंठापुरामुलू’ हा २०२० सालामधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री पूजा हेगडे आहे. याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री नगमा या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. अरविंदा समेथा वीरा राघवाच्या यशानंतर, त्रिविक्रमने चित्रपटाचे संगीतकार म्हणून एस. थमन यांच्या हाती संगीताची सूत्रे दिली होती आणि त्यांनी ती सक्षमपणे हाताळली आहेत. हा चित्रपट भले तेलगू असेल पण याचा चाहता वर्ग आणि प्रेक्षक वर्ग हा हिंदी भाषिक सुद्धा आहे. अनेकांनी तर इंग्लिश सबटायटल पाहून हा चित्रपट पाहिला आणि आनंद घेतला आहे.

तसेच ‘अला वैकुंठापुरामुलू’ या चित्रपटातील गाण्यांनी तर मजाच आणली आहे. चित्रपट येऊन २ वर्ष झाली पण गाणी अजूनही गाजत आहेत. यातील बुट्टा बोम्मा गाण्याने तर बहार आणली आहे. यामध्ये पूजा आणि अल्लूने केलेला डान्स तर इंस्टा रिल्सवर हिट झालं होत अजूनही आहे. तसेच रामूलो रामूला हे गाणेही जबरदस्त पार्टी सॉंग आहे. शिवाय ज्यामध्ये अल्लू अर्जुन असतो त्या चित्रपटाबद्दल काय सांगणार आणि किती सांगणार अशी अवस्था होते. यांनतर पुष्पाचे प्रचंड यश पाहून तुम्ही आगामी हिंदी डब चित्रपटाच्या यशाचा अंदाज लावू शकता.