Take a fresh look at your lifestyle.

‘विजेता’ चित्रपटाचे कलाकार बिग बॉसच्या घरात येणार; नव्या टास्कमुळे स्पर्धकांची तारांबळ उडणार?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनी या अत्यंत लोकप्रिय वाहिनीवर तुफान गाजत असलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी 3. अगदी पहिल्या सिजनपासूनच या शोने स्वतःचे असे वेगळेपण जपले आहे. यानंतर यंदाचे तिसरे पर्व आणखीच वेगळे आहे हे जाणवतेय. कारण घरात वेगवेगळ्या विचारांची माणसं आली काही आपली झाली काही परकीच राहिली. पण आता घरात सुरु असलेला प्रत्येक टास्क स्वतःसाठी खेळताना दिसणारे हे लोक हरण्यासाठी नाही तर विजेता होण्यासाठी खेळत आहेत. अशातच आता घरात विजेता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुबोध भावे आणि पूजा सावंत खास पाहुणे होऊन आले आहेत. यानंतर त्यांनी दिलेल्या टास्कमुळे घरात अक्षरशः राडा झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

आतापर्यंत बिग बॉस मराठीच्या घरात अनेक टास्क रंगले आणि अनेकदा राडे झाले. जरा कुठे खेळ रंगात येतोय असे वाटले कि स्पर्धकांमध्ये एकमेकांशी वादविवादही झाले म्हणून समजच. आजकाल तर अगदी मोहरीच्या दाण्याएवढे करूनदेखील त्यांना भांडणासाठी पुरते. अशातच आता ‘बिग बॉस मराठी ३ च्या घरामध्ये अभिनेता सुबोध भावे आणि पूजा सावंत आल्याचे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. याबाबतचा प्रोमो कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सुबोध आणि पूजेची एंट्री झाल्याचे दिसतेय तर नंतर दिलेल्या टास्कमध्ये खडाजंगी झाल्याचेही पाहायला मिळतेय.

आतापर्यंत बिग बॉस मराठीच्या या तिसऱ्या पर्वामध्ये घरात अनेक मालिका आणि चित्रपट मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनी खास पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी या शो मध्ये बिग बॉसचे माजी स्पर्धक शिव ठाकरे आणि नेहा शितोळे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर झिम्मा चित्रपटाची टीम प्रोमोशनसाठी आळायचे पाहायला मिळाले. यात क्षिती जोग, निर्मिती सावंत, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे आल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता अभिनेता सुबोध भावे आणि पूजा सावंत येणार आहेत. हे दोन्ही कलाकार आपला आगामी चित्रपट विजेताच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. त्यांना पाहून कलाकारांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण त्यांनी दिलेल्या टास्कमुळे मात्र सगळ्यांचीच तारांबळ उडते.