Take a fresh look at your lifestyle.

सुबोध भावे आणि तेजस्विनी पंडित या चित्रपटांत दिसणार एकत्र

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सुबोध भावे आणि तेजस्विनी पंडित यांची जोडी २०१० साली रानभूल या चित्रपटात दिसली होती. मात्र आता तब्बल एका दशकानंतर पुन्हा एकदा हि जोडी रुपरी पडद्यावर जादू करण्यासाठी सज्ज आहे. ‘वर्तमान’ हा आगामी चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पत्रकारिता, राजकारण, समाजकारण या विषयांवर भाष्य करणारा आहे.

हेमंत पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हेमंत पाटील या चित्रपटाविषयी सांगताना म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये आमदार खासदार आणि नेतेमंडळी यांचा जनतेशी व सर्वसामान्य नागरिकांशी वागण्याचा व पाहण्याचा दृष्टिकोण हा वेगळाच असतो. अशा ज्वलंत विषयावर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे लेखन संजय पवार यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर यांनी केले आहे. तर संगीत हर्षित अभिराज यांचे आहे. वर्तमान या चित्रपटात सुबोध भावे, मंगेश देसाई, राहुल सोलापूरकर, कुलदीप पवार, अवतार गिल, तेजस्विनी पंडित, संजय मोहिते अशा अनेक कलाकारांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.

‘वर्तमान’ हा चित्रपट येत्या मे महिन्यामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहात हा चित्रपट एकाच वेळी सर्वत्र प्रदर्शित होणार अशी माहिती चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील यांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर ते म्हणाले कि, मराठीतील मल्टीस्टारर व दर्जात्मक कथानक असलेला चित्रपट रसिकांच्या मनाचा ठाव घेईल यात मात्र शंका नाही.