Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बिंधास्त तिची अदा, दुनिया तिच्यावर फिदा’; सुबोध भावेची ती ‘फुलराणी’ फुलायला सज्ज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 4, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Fulrani
0
SHARES
4.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सुबोध भावेने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. येत्या काळात त्याचा ‘वाळवी’ हा हटके रहस्यमय चित्रपट रिलीज होतो आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अशातच सुबोधने आता त्याच्या आणखी एका चित्रपटाचे पोस्टर आणि त्यासोबत रिलीज डेटची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘फुलराणी’ असून हा चित्रपट २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सध्या सोशल मीडियावर सुबोधच्या या दोन्ही चित्रपटांची तुफान चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

अभिनेता सुबोध भावेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपला आगामी चित्रपट ‘फुलराणी’चे नवेकोरे आणि लक्षवेधी पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘हटके तिची स्टाईल, फाडु तिची स्माईल, बिंधास्त तिची अदा, दुनिया तिच्यावर फिदा. नव्या वर्षाची अनाऊंसमेन्ट ‘फुलराणी’ फुलणार. आपल्या नवीन वर्षात अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर २२ मार्च २०२३ पासून सिनेमागृहांत’. सुबोधने शेअर केलेलय पोस्टरमध्ये अभिनेत्री पाठमोरी दिसत आहे आणि त्यामुळे चित्रपटात फुलराणीची भूमिका नक्की कोण साकारतेय हे सांगणे अवघड आहे. पण यातच खरी मजा दडली आहे. हि फुलराणी कोण याची उत्सुकता तर चाहत्यांनासुद्धा आहे.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

माहितीनुसार, सुबोधच्या ‘फुलराणी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. तर विश्वास यांच्या जोडीने गुरू ठाकूर यांनी कथानकाचे लेखन केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे आपल्याला विक्रम राजाध्यक्ष नामक महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘पिग्मॅलिअन’ या अजरामर नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म तुफान गाजली होती आणि याच कलाकृतीवर प्रेरित होऊन विश्वास जोशी दिग्दर्शित ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

Tags: FulraniInstagram Postsubodh bhaveUpcoming Marathi MovieViacom18studiosviral postVishwas Joshi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group