Take a fresh look at your lifestyle.

खरंच का काय..?; सुबोध भावेची ‘जस्ट जॉईन Microsoft’ पोस्ट सोशल मीडियावर भारी चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकमान्य टिळक, बालगंधर्व, ..आणि काशिनाथ घाणेकर अशा अनेक अव्वल भूमिकांमधून अभिनेता सुबोध भावे याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसह प्रत्येक गोष्ट शेअर करण्यासाठी तो विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने ‘जस्ट जॉईन Microsoft’ असे म्हणत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर भारी चर्चेचा विषय बनला आहे. शिवाय नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा या पोस्टवर अक्षरशः पाऊस पडतोय.

अभिनेता सुबोध भावे याने शार केलेल्या फोटोमध्ये त्याच्यामागे मायक्रोसॉफ्टचा लोगो दिसत आहे. तर हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले कि, जस्ट जॉईन..Microsoft आमच्याकडे ” विंडोज” बसवून मिळतील. त्याच हे कॅप्शन पाहून अनेकांनी सुबोधला मायक्रोसॉफ्टमध्ये कामाला लागलास का अशी विचारणा केली आहे. तर काहींनी चेष्टा मस्करीचे सत्र सुरु केले आहे. या फोटोला आतापर्यंत १० हजाराहून अधिक लाईक मिळाले आहेत. शिवाय या फोटोवरच्या काही कमेंट इतक्या भन्नाट आहेत की काही बोलायचं कामच नाही.

या पोस्टवर कमेंट करीत एकाने सुबोधला ते काम सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्याने आपल्या कमेंटमध्ये लिहिले आहे कि, “सर, तिथं अजिबात नाटकं केलेली चालत नाहीत. रोजच काम करावं लागेल. लगेच जॉब सोडा. तुमच मन लागणार नाही. उगाच परत तुमच्या पहिल्या मार्केटिंगच्या जॉबसारखं व्हायचं”. यावर सुबोधनेही हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. याशिवाय आणखी एकाने कमेंट केली कि, “आमचे येथे Apple खात खात Windows बसवून मिळतील”. तर आणखी एकाने लिहिलेय कि, “तुमच्या खिडक्यांचे काम कधी पूर्ण होणार? भारतातली तिकीट खिडकी तुमची आतुरतेने वाट बघत आहे!” तर अन्य एकाने लिहिले कि, “पुढील चित्रपटात सुबोध भावे साकारणार बिल गेट्स!”, अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले कि, “आम्हाला पण एक विंडो बसवून हवीच आहे आणि सोबत त्या विंडोजचा use कसा करावा ह्याचा tutorialसुद्धा हवाय.