Take a fresh look at your lifestyle.

.. तर मी आत्महत्या करणार आहे! प्रभासच्या चाहत्याचं सुसाईड लेटर व्हायरल; काय आहे प्रकरण?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेलुगू सिनेइंडस्ट्रीची जान सुपरस्टार प्रभासला कोण ओळखत नाही..? त्याच फॅनफॉलोईंग इतकं जबरदस्त आहे कि असंख्य चाहते त्याची एक झलक बघायलाही आतुर झालेले असतात. एस एस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे प्रभासच अन्य आईंक भाषिक वर्गातही मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. बाहुबलीचे दोन्ही भाग हिट झाल्यानंतर प्रभासचे चाहते त्याच्या प्रत्येक आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यात अत्यंत उत्सुक असतात. त्याची चाहत्यांच्या त्याच्या बाबतीतलं क्रेझ काही भलतच आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणार सुसाईड लेटर याची प्रचिती देतय.

Suicide Note

दक्षिणेत प्रभासच मोठा चाहता वर्ग आहे. सुपर फॅनफॉलोईंग असलेल्या या अभिनेत्याचा एका चाहत्याने टोकाचा वेडेपणा करण्याचे ठरवले आहे. या चाहत्यानं चक्क लाडक्या अभिनेत्याला अर्थात प्रभासला सुसाईड लेटर पाठवून स्वतःला संपोवून घेऊन अशी धमकी दिली आहे. या चाहत्यानं प्रभासला लिहीलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या सुसाईड नोटमागील कारण तर आणखींचज आश्चर्यकारक आहे. प्रभासचा आगामी चित्रपट ‘सलार’विषयी प्रभासने कोणतीही माहिती लीक होऊ दिलेली नाही. यामुळे त्याच्या चाहत्याने मला सगळी माहिती सगळे अपडेट हवे आहेत असा हट्ट धरत हे सुसाईड लेटर लिहिले आहे.

‘सलार’ सिनेमासंदर्भात सुसाईड लेटर लिहिताना या चाहत्याने मागणी लिहिलंय की,”मी खूप दुखी आणि निराश आहे कारण असंच ‘साहो’,’राधे श्याम’ आणि प्रभासच्या याआधीच्या सिनेमां बाबतीत झालं. जर मला या महिन्यात ‘सलार’ सिनेमाची झलक पहायला मिळाली नाही, तर मी आत्महत्या करणार आहे. मला सलार सिनेमा संदर्भात अपडेट हवी आहे”. प्रभासने या सिनेमासंदर्भात काहीच अपडेट दिली नाही तर मी माझं आयुष्य संपवेल”. प्रभासच्या चाहत्यानं आपल्या पत्राला ‘सुसाइड लेटर’ असं संबोधलं आहे. हे लेटर इंटरनेटवर जोरदार व्हायरल झालं आहे. असा हा सुसाईड लेटर मधील धक्कादायक मजकूर वाचून सर्वानाच धक्का लागला आहे.

‘सलार’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, हा सिनेमा प्रभासच्या कारकिर्दीतील सर्वात थ्रीलिंग सिनेमा आहे. या सिनेमात प्रभास सोबत श्रृति हासन, पृथ्वीराज सुकुमारन, दिशा पटानी, जगपति बाबू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हे २०२२ वर्ष संपेपर्यंत सिनेमाचं शूटिंग पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे.