हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री सुंबूल तौकीर खानची काही वेगळीच क्रेझ आहे. तिने साकारलेल्या इमली या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. यानंतर ती बिग बॉस सीजन १६’चा भाग राहिली. ज्यामुळे तिचा चाहता वर्ग आणखीच वाढला. या सीजनदरम्यान जितकी चर्चा सुंबूलची होती तितकीच चर्चा तिच्या वडिलांनी देखील मिळवली होती. मुलीची काळजी, शालीन अन टिनावर काढलेला राग अशा गोष्टींमुळे तौकीर खान देखील कळत नकळत बिग बॉस टीआरपीचा भाग झाले. यांनतर आता त्यांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सोशल मीडियावर बोलले जात आहे.
सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग असलेल्या सुंबूलचे अब्बू तौकीर खान हे दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याचे गेल्या बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. सुंबूलने बिग बॉसमध्ये एंट्री घेतल्यानंतर तिचे वडील तौकीर खान हेदेखील फेमस झाले होते. दरम्यान त्यांचे आणि त्यांच्या लेकींचे बाँड दिसले. अनेकदा सुंबूल आपल्या वडिलांविषयी बोलताना दिसली.
आईमागे वडिलांनी आपले आणि आपल्या बहिणीचे कसे पालन पोषण केले, त्यांचे नटे संबंध किती प्रेमळ आहेत आणि वडील दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करत असल्याची गोष्ट या शोमध्येच बोलली गेली होती. अखेर आता तौकीर खान यांनी दुसऱ्या लग्नाचा ठाम निर्णय घेतला असून त्यांच्या कुटूंबाने या निर्णय़ाचे स्वागत केले आहे. याबाबत स्वतः सुंबूलने प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत सुंबूलने एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीशी संवाद साधताने म्हटले आहे कि, ‘मी खूप आनंदात आहे. त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करते. अब्बू येत्या आठवड्यामध्ये निलोफरशी लग्न करणार आहे. निलोफर या घटस्फोटीत असून त्यांना एक मुलगी आहे. आम्ही सर्वच खूप आनंदात आहोत. आमच्या परिवारात त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आमचे अब्बू हे आमच्यासाठी मोठी प्रेरणा राहिले आहेत. माझ्या वडिलांची दुसऱ्या लग्नाला काही हरकत नाही तर मी काय म्हणते याला फारसं महत्व नाही. त्यांनी तो निर्णय घेतला आहे. त्यात ते आनंदी आहेत तर आम्ही सगळ्यांनी त्याचे स्वागत करायला हवे. आम्हाला त्यांच्या दुसऱ्या लग्नासंबंधी कोणतीही अडचण नाही’.
Discussion about this post