Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुंबूलचा मित्र फहमान खानची BB हाऊसमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री; आता समीकरणं बदलणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 24, 2022
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sumbul_Fahmaan
0
SHARES
7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीचा अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस १६ हा प्रचंड चर्चेत आहे. सध्या ५० दिवस पूर्ण करून हे सदस्य पुढील प्रवासासाठी निघाले आहेत. आतापर्यंत या घरातील सदस्य सुंबूल तौकीर खानला तिच्या चाहत्यांनी फक्त आणि फक्त रडतानाच पाहिलं. गेम राहिला बाजूला आणि वेगळंच काहीतरी पहायला मिळालं. ज्यामुळे कुठेतरी तिची प्रतिमा खराब होते का काय अशी भीती तिला आणि तिच्या कुटुंबाला वाटू लागली. यानंतर आता घरातली पहिली वाईल्ड कार्ड आली आहे जी सुंबूलच्या पत्थ्यावर पडली आहे. कारण सुंबूलचा खास मित्र फहमान खान याने बीबी हाऊसमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री केली आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

‘बिग बॉस १६’चे स्पर्धक शालीन भानोत आणि सुंबूल तौकीर खान यांच्या नात्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. शालीन, टीना आणि सुंबूल असं लव्ह ट्रँगल असल्याची बरीच चर्चा सुरु होती. दरम्यान सुंबूलच्या वडिलांनी तिला टीना आणि शालिनसोबत वारंवार लांब राहण्याचा सल्ला दिला. मात्र तरीही सुंबूल कुठेतरी भरकटत गेली आणि अखेर सलमान खाननेही याविषयी भाष्य केले. ज्यानंतर पुन्हा तिच्या वडिलांनी तिला समज दिली. यानंतर सुंबूल शालीन आणि टीनापासून लांब झाली पण उदास आणि एकटी राहू लागली आहे. म्हणूनच कदाचित आता सुंबूलचा मित्र फहमान खान तिच्यासाठी या शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री होऊन आला आहे. त्याला पाहून सुंबूलच्या आनंदाला काही थाराचं राहिला नाही.

View this post on Instagram

A post shared by FAHMAAN & SUMBUL UNIVERSE (@imlie.aryan.forever)

व्हायरल प्रोमोमध्ये फहमान खान बिग बॉसच्या घरात दाखल झाल्याचे दाखवण्यात आले. हा व्हिडिओ बिग बॉसच्या घोषणेने सुरू होतो. बिग बॉस म्हणतात कि, ‘घरात पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होत आहे. यानंतर फहमान घरात प्रवेश करतो आणि त्याला पाहून सुंबुल पळत जाऊन त्याला मिठी मारते. अत्यंत भावुक होत बोलते कि, ‘हे स्वप्न आहे का की तू खरोखर आला आहेस, तू येणार नव्हतास ना..?’ यावर फहमान म्हणतो कि, ‘मला वाटले की तुला माझी गरज आहे.’

View this post on Instagram

A post shared by Sumbul Touqeer (@sumbul_touqeer)

फहमानच्या येण्याने घरातील अनेक समीकरणं बदलणार, उलट पुलट होणार यात काही वादच नाही. पण एव्हढं आहे कि, त्याच्या येण्याचा सुंबुलला खूप आनंद झालाय. ती असंही म्हणाली आहे कि, ‘आता तू आलास.. मला दुसरे काही नको.’ सुंबुल आणि फहमान यांनी स्टार प्लस शो ‘इमली’ मध्ये एकत्र काम केले आहे आणि तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. अनेकदा त्यांच्या डेटींगच्या बातम्याही आल्या आहेत.

Tags: Bigg Boss 16Colors TVFahmaan KhanSumbul Touqueer KhanWild Card Entry
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group