Take a fresh look at your lifestyle.

दुकानांची नावं मराठीत लिहिणं वरवरचं..; राज्य सरकारच्या निर्णयावर सुमित राघवनने ठेवले बोट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार सापडतील जे अभिनयात उत्कृष्ट आहेतच. याशिवाय सामाजिक भान जपण्यातदेखील नेहमी पुढे दिसतात. ते नेहमीच आपल्या प्रतिक्रिया अगदी परखडपणे व्यक्त करतात. त्यामुळॆ अनेकदा विविध वादांना तोंड फुटताना दिसते. अश्याच कलाकारांमध्ये आघाडीचे नाव येते ते अभिनेता, सूत्रसंचालक म्हणून उत्तम भूमिका वाढविणारा सुमित राघवन. सुमित आणि त्याची पत्नी चिन्मयी हे दोघेही नेहमीच कोणत्याही मुद्द्यावर बोलताना स्पष्ट प्रतिक्रिया देतात. आढेवेढे घेणे जणू त्यांच्या स्वभावात नाहीच. यावेळी सुमितने ठाकरे सरकारच्या दुकानांच्या पाट्या ‘मराठी’ करण्याच्या निर्णयावर बोट ठेवत एक आगपाखड करणारे ट्विट केले आहे.

जे फक्त अभिनय न करता समाजातील इतर मुद्द्यांवर आपले परखड मत व्यक्त करत असतात त्यांच्या बोलण्याला किंमत असते असे म्हटले जाते. याचा प्रत्यय सध्या येताना दिसतोय. तो म्हणजे, समाजात होत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर अभिनेता सुमित राघवनने बोलताना दिसती. यानंतर आता राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयावर त्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. राज्य सरकारने राज्यातील सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय घेतला आणि यावर सुमितने ट्विट केले. हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे.

या ट्विटच्या माध्यामातून अभिनेता सुमित राघवनने लिहिले कि, “मी म्हणतो हरकत नाही. इंग्लिशबद्दल तिरस्कार नाहीये. पण जी राज्याची भाषा आहे, ती नको का जपायला. दुकानांची नावं मराठीत लिहिणं हे सगळं वरवरचं झालं. जो ‘मराठी’ आहे त्याला किंमत आहे का भाषेची? मग अमराठी व्यापाऱ्यांच्या माथी का मारा? ही बळजबरी झाली नाही का? अवस्था बघा मराठी शाळांची?” हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. अनेकजण या ट्विटवर सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. अर्थात अनेकांना त्याचा मुद्दा पटतोय असेच म्हणावे लागेल.