Take a fresh look at your lifestyle.

सनी लिओनी ऑनलाईन फ्रॉडची शिकार; 2 हजारामुळे सिबिल झाला खराब

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार खूप वाढत चालले आहेत. यामुळे सतत सतर्कता बाळगण्याबाबत सांगितले जाते. आतापर्यंत अनेक प्रकार असे उघड झाले आहेत. नेहमी सामान्य माणसांची फसवणूक झाल्याचे प्रकार तुम्ही पहिले असाल. पण आता या फसवणुकीची शिकार बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी झाली आहे. होय सनी लिओनीची ऑनलाईन फसवणुक झाल्याचे उघड झाले आहे. फसवणूक झाल्यानंतर सनी लिओनीने ही गोष्ट ट्विट करून समोर आणली होती. पण काही तासांतच तिने हे ट्विट हटवलं होत. माहितीनुसार सनीचं पॅनकार्ड वापरून कुणीतरी धनी अँपवर २ हजार रूपयांचे कर्ज काढले आणि न फेडल्यामुळे सनीचा सिबिल खराब झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, सनी लिओनीचं पॅन कार्ड वापरून एका अज्ञात व्यक्तीने २ हजार रूपयांचे कर्ज काढले आहे. हे सनीच्या लक्षात आले असता तिने ट्विट करून आपली फसवणूक झाल्याचे जाहीर केले. यानंतर नेटक-यांनी विचारलेले प्रश्न आणि माहितीसाठी येणाऱ्या फोनला कंटाळून तिने ते ट्विट डिलीट केले. दरम्यान आपली फसवणूक झाली तशी अनेकांची होऊ नये, तसेच हे कसं शक्य आहे ? याला काय तरी उपाय करायला हवा. अशा आशयाचे सनीने ट्विट केले होते.

ऑनलाईन पध्दतीने केली जाणारी फसवणूक रोखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या अकाऊंटबाबत सजग असले पाहिजे. असे प्रकार घडू नये म्हणून बँकांनी काय तरी निर्बंध घालायला हवेत. आतापर्यंत फसवणूक झालेल्या अनेकांनी इंडियाबुल्स सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये तक्रारी केल्या आहेत. एव्हाना असंख्य तक्रारी दाखल झाल्या असतील पण अजून काही निकाल लागल्याचे दिसत नाही. यामध्ये सनीनेदेखील आपली फसवणूक झाल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये इंडियाबुल्स सिक्युरिटीज लिमिटेडला टॅग केले आहे. कारण या फसवणुकीनंतर फसवणुक सनीचा सिबील स्कोर खराब झाला आहे. असे खुद्द सनीने पोस्टमध्ये सांगितले. मात्र यानंतर फसवणुक झालेल्या अनेकांनी सनीसोबत संपर्क साधून कुठे तक्रार करायची? त्याचं ऑफिस कुठे आहे? अशी विचारणा करण्यासाठी भरपूर फोन केले यामुळे वैतागून तिने हे ट्विट डिलीट केले.

यानंतर सनीने आणखी एक ट्विट केले आहे. यात तिने लिहिले कि, त्वरीत याचे निराकरण केल्याबद्दल आणि हे पुन्हा कधीही होणार नाही याची खात्री केल्याबद्दल @IVLSecurities @ibhomeloans @CIBIL_Official धन्यवाद. मला माहित आहे की तुम्ही इतर काळजी घ्याल. ज्यांना भविष्यात हे टाळायचे आहे त्यांनी हि समस्या होऊच देऊ नका. कारण वाईट सिबिलचा सामना कोणीही करू इच्छित नाही !!! मी माझ्या मागील पोस्टचा संदर्भ देतेय. यानंतर अनेकांनी या ट्विटवर सनी अभिनेत्री असल्यामुळे तीच काम झालं पण आमचं काय असा सवाल उपस्थित केला आहे.