Take a fresh look at your lifestyle.

अगं बाई शांताबाई! ‘आमदार निवास’मध्ये बोल्ड सनी लावणार मराठमोळे लटके झटके

0

हॅलो बॉलिवूड ओनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख असलेली अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या अदांनी बॉलिवूड इंडस्ट्री तर चांगलीच गाजवली आहे. सिने सृष्टीत स्वतःच असं वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर आता तिने प्रादेशिक चित्रपटांमध्ये संधी घेण्याचा निर्धार केल्याचे दिसून आले आहे. कारण तिने तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता मराठीतील एका गाण्यावर दिलखेचक लटके झटके लगावले आहेत.

काही वर्षांपूर्वी २०१५ मध्ये शांताबाई या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्र नाचवला आणि गाजवला होता. या गाण्याने अक्षरश: धुमाकुळ घातला होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला ८५ कोटींहून जास्त व्ह्यूज आहेत आणि याचे चाहते तर विचारूच नका. पण यानंतर आता याच गाण्यामध्ये महाराष्ट्राची आधुनिक ‘शांताबाई’ म्हणून बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी लटके झटके लगावताना दिसणार आहे. संजीव कुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मध्ये ‘शांताबाई’ या लोकप्रिय मराठी गाण्यावर ती आयटम सॉंग करताना दिसणार आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवा यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांचे मूळ गीत असलेले हे गाणे नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून आधुनिक गाणे तयार केले आहे. याआधी सनी लिओनी ‘बॉईज’ या मराठी चित्रपटामध्ये ‘कुठं कुठं जायच हनिमूनला’ या आयटम सॉंगमध्ये दिसली होती. यानंतर आता ती लवकरच ‘आमदार निवास’ या चित्रपटात झळकणार आहे. ते हि आधुनिक ‘शांताबाई’ च्या रूपात. ’आमदार निवास’ हा चित्रपट सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित विद्यांवर भाष्य करतो.