Take a fresh look at your lifestyle.

Super Dancer 4 – शिल्पा शेट्टीच्या जागी आता करिश्मा कपूर भूषविणारं परिक्षकाची भूमिका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा गेल्या बऱ्याच काळापासून ‘सुपर डान्सर’ या डान्सिंग रिअ‍ॅलिटी शोला जज करतेय. सध्या या शोचा चौथा सीजन सुरू आहे. याही सिजनमध्ये शिल्पा जजच्या खुर्चीवर दिसत होती. मुळात होती म्हणण्याचे कारण असेक कि, आता शिल्पा या शोचे शूट करत नाहीये. कारण, पोर्नोग्राफी प्रकरणी शिल्पाचा पती राज कुंद्रा याला अटक झाली आहे आणि यानंतर शिल्पाने माध्यमांपासून अंतर ठेवले आहे. त्यामुळे शिल्पाचे शोच्या शूटिंगला न जाणे यामागे पती राज कुंद्राला झालेली अटक हेच कारण असल्याचे मानले जात आहे. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, ‘सुपर डान्सर ४’च्या आगामी भागात शिल्पाच्या जागी बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर स्पेशल जज म्हणून उपस्थित राहणार आहे. त्यामुळे करिश्मा, गीता कपूर व अनुराग बासू यांच्यासोबत हे शूटींग सुरू झाले आहे.

शोच्या शूटिंगदरम्यान ऐनवेळी शिल्पाने शूटसाठी नकार दिल्यामुळे निर्मात्यांची मात्र नाराजी झाली. शिल्पाने शूटींग सेटवर न येण्याचे कारण अद्यापतरी स्पष्ट केलेले नाही. केवळ काही वैयक्तिक कारणांमुळे मी येऊ शकणार नाही, असे तिने मेकर्सला कळवले. मात्र तिच्या न येण्याचे कारण राज कुंद्राला झालेली अटक असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये वारंवार केला जातोय. याआधी मे महिन्यातही शिल्पाने शोमधून असाच ब्रेक घेतलेला. तेव्हा तिच्याजागी मलायका अरोराने तिची जागा भरून काढली होती आणि आता तिच्या जागेवर करिष्मा कपूर विराजमान होणार आहे.

मुख्य वृत्तानुसार, अश्लील चित्रपट निर्मिती करण्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि प्रसिद्ध व्यावसायिक राज कुंद्रा याला कोर्टाने २३ जुलै २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणी सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती.

मुळात फेब्रुवारी २०२१ महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना कळली होती. याच प्रकरणाचा छडा लावताना तपासाचा एक भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली आणि त्याची सखोल चौकशी करून न्यायालयात हजर करण्यात आले.