Take a fresh look at your lifestyle.

सुपरस्टार प्रभासची मोठी घोषणा ; ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे पोस्टर केले प्रदर्शित

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुपरस्टार प्रभासने आपल्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. प्रभास दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटात काम करणार आहे. यापूर्वी ओम राऊत यांनी अजय देवगन स्टारर सुपरहिट फिल्म ‘तान्हाजी’ दिग्दर्शित केला होता. प्रभासने आदिपुरुषचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना प्रभासने लिहिले की, वाईटा वर मात केल्याचा आनंद साजरा करूया.

चित्रपटात प्रभास आदिपुरुषची भूमिका साकारताना दिसू शकतो. मात्र, प्रभासचा लूक अद्याप समोर आला नाही. भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट 2022 मध्ये हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

याशिवाय प्रभास दीपिका पादुकोणसोबतही दिसणार आहे. दीपिका आणि प्रभास ‘विजयंती’ चित्रपटात काम करत आहेत. मात्र अद्याप चित्रपटाच्या नावाची घोषणा झालेली नाही. दोघांना एकत्र पाहून चाहते खूप उत्साही आहेत.