Take a fresh look at your lifestyle.

‘सुपरस्टार रजनी’ बनला स्टायलिश सुपरकॉप; दरबार चित्रपटाचा ट्रेलर लाँच

0

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन । सुपरस्टार रजनीकांतच्या ‘दरबार’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून, रजनी यामध्ये ‘सुपरकॉप’ च्या रूपात झळकत आहे. तरुण आणि भुरभुरत्या केसांमध्ये रजनी खुलून दिसतोय. या धमाकेदार ट्रेलरमध्ये रजनीची सिग्नेचर ऍक्शन भरलेली आहे. चित्रपटात सुनील शेट्टी सुपर व्हिलन बनला आहे, त्याचा लूकही हटके ठेवण्यात आला आहे. पांढऱ्या दाढी मध्ये सुनीलचा व्हिलन म्हणून दरारा भासत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यात हिरॉईनच पात्र साकारतेय. एकूणच रजनीकांतचा हा ट्रेलर रजनीप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर सलमान खानने शेअर केले होते. रजनीकांतने राजकारणात एंट्री घेतली असली तरी सिनेसृष्टीतील आपला दबदबा कायम राखला आहे. त्यामुळेच रजनीकांतच्या दरबार चित्रपटाची प्रचंड उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आता झळकला आहे.

या वर्षी रिलीज झालेला २.० हा बिग बजेट चित्रपट अपेक्षेएवढी कामाई करू शकला नव्हता. बऱ्याच वर्षानंतर रजनीचा लोकप्रिय असलेला पुरेपूर मसाला जॉनर घेऊन हा चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाकडून बॉक्स ऑफिस सह सगळ्यांनाच खूप अपेक्षा लागून असणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: