Take a fresh look at your lifestyle.

‘तांडव’ ला दिलासा नाहीच; सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता सैफ अली खानची ‘तांडव’ ही सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्या मुळे ‘तांडव’विरोधात सहा राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यामुळे ‘तांडव’च्या निर्मात्यांनी अटकेपासून संरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, आता न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावल्याने ‘तांडव’च्या निर्मात्यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे.  तसंच या सीरिजशी संबंधित कोणत्याही कलाकाराला किंवा व्यक्तीला सुरक्षा देण्यात येणार नाही अस सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

बुधवारी सर्वोच्च न्यायालयात ‘तांडव’ सीरिजच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सीरिजच्या निर्मात्यांना फटकारलं आहे. तसंच अभिनेता मोहम्मद झिशान अय्युब, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि ‘तांडव’च्या मेकर्सना अटकेपासून सुरक्षा देण्याचं नाकारलं आहे. इतकंच नाही तर अटकपूर्व जामिनासाठी आणि एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत.

वाद नेमका कशावरुन पेटला?

या वेब सीरीजमध्ये भगवान शिव आणि भगवान राम यांचा अपमान झाल्याचा आरोप आहे. ‘तांडव’मधील एका दृश्यात ‘नारायण-नारायण. देवा काहीतरी कर. रामजींचे अनुयायी सोशल मीडियावर सतत वाढत आहे’, अशा आशयाचा एक संवाद आहे. या संवादासोबातच, इतर बरेच संवाद देखील वादात अडकले आहेत. हा वाद इतका वाढला की, माहिती व प्रसारण मंत्रालयालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी त्वरित अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या अधिकाऱ्यांना बोलावले. भाजपच्या अनेक नेत्यांनी ‘तांडव’विरोधात आंदोलन करून, वेब सीरीजवर त्वरीत बंदी घालण्याची मागणी केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.