Take a fresh look at your lifestyle.

रियामुळेच सुशांत डिप्रेशनमध्ये गेला; FIR मध्ये गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं  आहे. सुशांतसिंहचे वडील कुंदन कुमार यांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिनें त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत बिहार येथील न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. रविवारी सुशांतच्या वडिलांनी रियाच्या विरोधात एफआयआर दाखल केला असून यात रियावर अतिशय गंभीर प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सुशांतच्या वडिलांनी बिहारमधील पाटण्यातील राजीवनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. रियाने सुशांतकडून पैसे घेऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी पाटणा पोलिसांनी मुंबईत येऊन पोलिस उपायुक्तांचीही भेट घेतली आहे. राजीवनगर पोलिस ठाण्याचे प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली चार सदस्यांच्या पथक याप्रकरणी मुंबईत दाखल झाले आहेत.

यावेळी सुशांतच्या वडिलांनी केवळ रियावरच नाही तर तिच्या कुटुंबियांवर देखील गंभीर आरोप केलेत. पाटण्यात रिया आणि कुटुंबियाच्या विरोधत एफआयआर देखील केली आहे. यात रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्‍या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिया आणि तिच्या कुटुंबियांनी सुशांतसोबत जवळीक वाढवली. त्याच्या प्रत्येक खासगी गोष्टींत रियाचे कुटुंबिय देखील हस्तक्षेत करत होते.इतकंच नव्हे तर त्याला त्याचं राहतं घर सोडण्यास सांगितलं होतं. सुशांत राहत असलेल्या  घरी भूतबाधा असल्याचं रियाच्या कुटुंबियांनी त्याला सांगितलं. यामुळे त्याला राहत घर सोडावं लागलं होतं. रियाने त्याला चांगलं घर सोडून मुंबई एअरपोर्टच्या जवळ एका रिसॉर्टमध्ये राहायला भाग पाडलं होतं.

रियानं सुशांतला औषधांचा ओव्हरडोस दिल्याचंही या एफआयआरमध्ये म्हटलं गेलं आहे. सुशांतवर उपचार करण्यासाठी रिया त्याला घेऊन तिच्या मुंबईतील घरी गेली होती. तिथं तिनं त्याला औषधांचे ओव्हरडोस दिले.

सुशांतला ऑफर आलेल्या चित्रपटांमझ्ये स्वत:ला देखील भूमिका मिळावी, यासाठी रिया अट ठेवायची.मी असेल तरच तू सिनेमासाठी हो बोल असा दबाव सुशांतवर ती टाकायची, असा आरोप तिच्यावर करण्यात आल आहे. सुशांतचे मॅनेजरही तिनं बदलले होते. त्याच्या जागी स्वत:च्या मर्जीतल्या लोकांनी तिनं नेमलं होतं, असं सुशांतच्या वडिलांनी म्हटलं आहे.

Comments are closed.