Take a fresh look at your lifestyle.

१४ जूनला काय झालं ?? सिध्दार्थ पिठाणीने केला ‘हा’ महत्वाचा खुलासा

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सीबीआयने अलीकडेच सिद्धार्थ पिठाणीची चौकशी केली आहे. सिद्धार्थने सुशांतबाबत सीबीआयसमोर मोठे खुलासे केले आहेत. अहवालानुसार सिद्धार्थ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की 2019 नंतर सुशांतच्या आयुष्यात गोष्टी बदलू लागल्या, सुशांतचे काम गेल्या वर्षी ऑगस्टपासून थांबले होते.आणि त्याने रिया चक्रवर्तीसोबत जास्त वेळ घालवायला सुरुवात केली. पण त्यानंतर अशीही एक वेळ आली जेव्हा सुशांत एकटाच राहिला होता.

सिद्धार्थ म्हणाला की त्याच्या वडिलांचे काम चांगले चालत नाही, म्हणून ते हैदराबादला पैसे मिळवण्यासाठी गेले. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये एक दिवस सुशांतचा फोन आला. सुशांत म्हणाला की तो अभिनय सोडून आपला ड्रीम प्रोजेक्ट 150 सुरू करणार आहे.

सिद्धार्थने निवेदनात म्हणले , रियाने जानेवारीत प्रथम त्यांना सोडले. मग रिया काही दिवसांनी परत आली होती. रियाने मला सांगितले की आता,मी, रिया आणि दीपेश एकत्र सुशांतची काळजी घेतील. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुशांत म्हणला होता की त्याला बहीण नीतूकडे जायच आहे.आम्ही तिकडे गेलो तेव्हा सुशांतची तब्बेत ठीक होती. तिथेच राहिल्यानंतर आम्ही परत मुंबईला परतलो. यानंतर सुशांतला बरे वाटू लागले. तो वर्कआउट करायचा. सुशांतला तब्येत बरी होती, म्हणून त्याने औषध घेणे बंद केले. मी त्याला अशी औषधे अचानक बंद करण्यास मनाई केली होती.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुशांतची तब्येत पुन्हा खालावू लागली. तो आमच्यापासून दूर राहू लागला, पण त्यावेळी रिया त्याच्याबरोबर होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात सुशांतची तब्येत आणखी खालावली. तो खोलीत एकटाच राहू लागला. त्याने आमच्याशी बोलणेही बंद केले होते, म्हणून आम्ही सर्वांनी रिया आणि सुशांतला एकटे सोडले. लॉकडाऊनमध्ये रिया सुशांतसोबत होती.
सिद्धार्थने पुढे निवेदनात म्हणाले, 8 जून रोजी सकाळी 11:30 वाजता रिया आपली बॅग पॅक करून घरी गेली. रियाने मला सुशांतची काळजी घ्यायला सांगितले. त्यावेळी सुशांतने रियाला मिठी मारली आणि रिया निघून गेली. थोड्या वेळाने सुशांतची बहीण मितू घरी आली. तिने सुशांतची काळजी घेतली. मितू दीदी घरी असताना सुशांतला जुन्या गोष्टी आठवायच्या आणि रडायचा. 12 जून रोजी, मितू दीदीने आपल्या मुलीची आठवण करून दिली आणि ती परत तिच्या घरी गेली.

काय झालं होतं 14 जूनला – 

14 जून रोजी सकाळी 10.30 च्या दरम्यान मी हॉल मध्ये माझे काम करत होतो आणि सकाळी 10.30 च्या सुमारास केशवने मला सांगितले की सुशांत सर दरवाजा उघडत नाहीत. मी दीपेशला फोन केला आणि आम्ही दोघांनी जाऊन दार ठोठावले पण सुशांतने दरवाजा उघडला नाही. मग मला मीतू दीदीचा फोन आला आणि तिने सांगितले की मी सुशांतला फोन केला पण तो फोन उचलत नाही. मी तिला सांगितले की आम्ही प्रयत्न करीत आहोत पण तो दरवाजा उघडत नाही. मी मितू दीदीला घरी बोलावले.

मी वॉचमनला चविवाल्याला कॉल करायला सांगितले पण त्याने नीट मदत केली नाही. मग मी गूगल वरुन रफीक चावी वाल्याचा नंबर काढला आणि दुपारी 1.06 मिनिटांनी कॉल केला. त्याने मला 2000 रुपयांची मागणी केली. रफिकच्या सूचनेनुसार मी त्याला लॉकचा फोटो व घराचा पत्ता पाठविला. दुपारी 1.20 वाजता रफिक आपल्या एका साथीदारासह तेथे पोहोचला. कुलूप पाहिल्या नंतर त्याने सांगितले की तो चावी बनवू शकत नाही म्हणून मी त्याला कुलूप तोडण्यास सांगितले. रफीकने कुलूप तोडला आणि मी त्याला पैसे दिले आणि जायला सांगितले.

यानंतर मी आणि दीपेश सुशांतच्या खोलीत गेलो. अंधार पडला होता, दीपेशने खोलीचा प्रकाश उजळला होता आणि आम्हाला सुशांत हिरव्या कपड्याने पंखावर लटकलेला आढळला. मी मीतू दीदी यांना हे सांगितले आणि नंतर 108 ला फोन करून घटनेची माहिती दिली. मग सुशांतची बहीण नीतूचा फोन आला आणि आम्ही तिला संपूर्ण गोष्ट सांगितली. तिने आम्हाला सुशांतला खाली घेण्यास सांगितले. मग मी नीरजला चाकू आणण्यास सांगितले. मी सुशांतच्या गळ्यावरील फास चाकूने कापला, मग मी आणि दिपेशने सुशांतला बेडवर झोपवले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’