Take a fresh look at your lifestyle.

रियामुळे सुशांत होता त्रस्त; अंकिताने पोलिसांना दाखवले ‘ते’ मेसेज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे संपूर्ण तपासाला आता वेगळं वळण लागलं आहे. ‘त्यातच रिया सुशांतला त्रास देत होती’, अशी माहिती सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेदेखील बिहार पोलिसांनी दिल्याचं ‘सीएनएन न्यूज १८’ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा साऱ्यांच्या नजरा या प्रकरणाकडे वळल्या आहेत.

२०१९ मध्ये जेव्हा अंकिताने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी सुशांतने तिच्याशी संपर्क साधला होता. यावेळी बोलत असताना रियामुळे त्याला त्रास होत असल्याचं त्याने अंकिताला सांगितलं होतं. याचा पुरावा म्हणून अंकिताने सुशांतचे मेसेज देखील पोलिसांना दाखवले होते.

तसेच,रियासोबतच्या नात्यात सुशांत खुश नाही असंही त्याने अंकिताला सांगितलं होतं. रियाला डेट करण्यापूर्वी सुशांत अंकिता लोखंडेला डेट करत होता. जवळपास ६ वर्ष ते एकमेकांसोबत होते. मात्र काही कारणामुळे  त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुशांतच्या निधनाची बातमी समजताच अंकिता प्रचंड दु:खी झाली असून अनेक वेळा ती सुशांतसाठी पोस्ट करत असते.

Comments are closed.