Take a fresh look at your lifestyle.

जिम ट्रेनरचा मोठा खुलासा;डिसेंबरमध्ये सुशांत घ्यायचा संशयास्पद औषधं

मुंबई | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचले आहे. याप्रकरणी गेल्या दीड महिन्यापासून तपास सुरू आगे. मात्र मागील 2-3 दिवसात काही मोठ्या गोष्टी, काही खुलासे समोर आले आहेत. नुकतेच सुशांतच्या जिम ट्रेनरने देखील त्याच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. या ट्रेनरने अशी माहिती दिली की, सुशांत डिसेंबरमध्ये अशी काही औषधे घेत होता की त्याआधी त्याने ती कधीच घेतली नव्हती.

सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर दीड महिन्याने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर काही नवीन खुलासे होत आहेत. याच दरम्यान सुशांतचा जिम ट्रेनर याने अशी माहिती दिली आहे की, सुशांत सिंह राजपूत डिसेंबर 2019 पासून काही संशयास्पद औषधे घेत होता. ज्यामुळे त्याच्या तब्बेतीवर विपरित परिणाम होत होता.

एका मीडिया हाऊसशी केलेल्या चर्चेमध्ये सुशांत सिंह राजपूतचा ट्रेनर सामी अहमद याने अशी माहिती दिली की, सुशांतने याआधी अशी औषधं कधी घेतली नव्हती. ही औषधे घेतल्यानंत त्याचे हातपाय कापत असत. बऱ्याच काळासाठी तो अस्वस्थ राहू लागला होता. सामीने अशी माहिती दिली की, ‘सुशांतने याआधी अशा औषधांचा वापर कधी केला नव्हता. सुशांत त्याला म्हणाला होती की एक-दोन महिन्यासाठी तो हा औषधांता कोर्स करत आहे. जेव्हा सांमीने त्याला तसे करण्यास मनाई केली तेव्हा तो म्हणाला होता की एकदा कोर्स सुरू केल्यानंतर असे मध्येच सोडू शकत नाही.’

सामी पुढे म्हणाला की नैराश्याबरोबरच सुशांतला डेंग्यू झाला होता.’नोव्हेंबरमध्ये सुशांतने मला सांगितले की पॅरिसहून परतल्यानंतर त्याला डेंग्यू झाला आहे. त्याचप्रमाणे तो डॉक्टरांचे काउंसिलिंग देखील सुरू होते. सुशांतचे वागणे खूप बदलले होते.

Comments are closed.