Take a fresh look at your lifestyle.

आत्महत्येपूर्वी या मित्राला भेटला होता सुशांत…..मित्राने केले धक्कादायक खुलासे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत यांचे मित्र आणि क्रीएटीव्ह कंटेंट मॅनेजर सिद्धार्थ पिठानी यांनी सांगितले की सुशांतला ते गेल्या एक वर्षापासून ओळखत होते. दोघांची भेट कॉमन मित्रांद्वारे झाली. नंतर सिद्धार्थने सुशांतसाठी कामही करण्यास सुरवात केली

सिद्धार्थच्या म्हणण्यानुसार तो सुशांतच्या वैयक्तिक बाबींपासून दूर रहायचा आणि त्याविषयी त्यांच्याशी बोलतही नव्हता. त्याला रिया चक्रवर्ती बद्दल काही माहित नव्हते. सिद्धार्थ पिठानी सुशांतचा तोच मित्र आहे जो शेवटच्या क्षणी त्याच्या घरी राहत होता. सिद्धार्थने सांगितले की कोरोनाच्या काळात तो सुशांतसोबत राहत होता.

सिद्धार्थ पुढे म्हणाले की, त्यांनी 13 जून रोजी रात्री 1 वाजता सुशांतसिंग राजपूत यांची भेट घेतली. सुशांतची पूर्व मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यामुळे सुशांत चिंतीत होता कारण या प्रकरणात त्याच नाव जोडलं गेलं होतं. सिद्धार्थच्या म्हणण्यानुसार सुशांतच्या कुटूंबाने त्याला सुमारे 15 कोटी रुपये बद्दल विचारले होते, ज्याची त्यांना माहिती नाही, म्हणून त्यांनी कुटुंबीयांना माहिती देण्यास नकार दिला. त्याने हे ई-मेलद्वारे आयओला सांगितले आहे. सुशांतच्या कुटुंबातील दोन जणांचा त्याच्याशी संपर्क झाला.सिद्धार्थ सध्या बिहार पोलिसांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. त्याला सुशांतला न्याय द्यायचा आहे.
.

Comments are closed.