Take a fresh look at your lifestyle.

सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टने खळबळ ; मानेवर होती 33 सेमी लांब खूण

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शनिवारी सुशांतचा 7 पानांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्ट मधून खळबळजनक माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, सुशांतच्या गळ्यावर 33 सेमी लांब एक खूण असल्याचं उघड झाले आहे. त्याची जीभ बाहेर नव्हती आली. दात ठीक होते, शरीरावर कोणतीही जखम किंवा खूण नव्हती. रिपोर्टनुसार, सुशांतच्या डोळे अर्धवट उघडले होते तसेच शरीरातील कोणतीही हाडं तुटली किंवा मोडलेली नव्हती.

सुशांतच्या तोंडातून किंवा कानातून फेस अथवा रक्त बाहेर आले नव्हते हे सुद्धा अहवालात नमूद केलं आहे मात्र मानेच्या खाली 33 सेंटीमीटर लांब एक खूण होती. फासाची खूण हनुवटीच्या खाली 8 सेंमी होती. या रिपोर्टनंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी पुन्हा या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’