Take a fresh look at your lifestyle.

देवावर माझा विश्वास , सुशांतला न्याय मिळणारच ; बहीण श्वेता सिंह किर्तीने व्यक्त केला विश्वास

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास ईडी आणि सीबीआय करत आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळेपर्यंत चाहत्यांनी सुशांतच्या कुटुंबीयांमागे भक्कमपणे उभं राहावं, अशी विनंती सुशांतची बहिणी श्वेता सिंह किर्ती हिने केली आहे. तसेच सुशांतला न्याय मिळणारच असा विश्वास देखील तिने व्यक्त केला आहे.

“प्रार्थना करणं ही एकच गोष्ट मला माहित आहे. माझा देव हिच माझी खरी ताकत आहे.माझा देवावर विश्वास आहे. अशी शक्ती जी संपूर्ण सृष्टीला नियंत्रणात ठेवते. त्या शक्तीवर मला पूर्ण विश्वास आहे. सुशांतला न्याय मिळणारच कारण देवावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही असाच पाठिंबा द्या लवकरच सत्य समोर येईल.” अशी इन्स्टाग्राम पोस्ट करुन किर्तीने सुशांतच्या कुटुंबीयांमागे भक्कमपणे उभं राहावं अशी विनंती चाहत्यांना केली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरण सीबीआयच्या हाती गेल्यानंतर मागील काही दिवसात अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’