Take a fresh look at your lifestyle.

सुशांतसिंगच्या एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने घेतली त्याच्या कुटुंबीयांची भेट

हॅलो बॉलीवूड । ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधून खरी ओळख मिळवणाऱ्या सुशांतसिंग च्या घरी याच मालिकेमधील त्याची नायिका आणि एक्स गर्लफ्रेंड अंकीता लोखंडेने त्याच्या कुटुंबियांची आज भेट घेतली आहे. वांद्रे येथील क्वा्टर रोड परिसरातील घरी ती आली होती.

बॉलिवूडचा एक उदयोन्मुख कलाकार म्हणून सुशांत सिंह राजपूत ओळखला जात होता. चित्रपट सृष्टीत ‘काय पो चे’ पासून सुरवात करणारा त्याच्या कारकिर्दीत सर्वात सुपरहिट ठरलेला ‘एम.एस.धोनी’ सिनेमात त्याने महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारुन  सर्वांचीच मनं जिंकली होती . ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील मानवच्या भूमिकेमुळे तो घराघरांत पोहचला होता. अंकिता लोखंडे सोबत तो अनेक वर्षे नात्यामध्ये होता.

परवा मुंबईतील वांद्रे येथील घरात त्याने आपले जीवन गळफास घेऊन संपवलं. त्याच्या स्वतःला अचानकपणे संपवण्याच्या कृतीमुळे त्याचे अनेक चाहते शोकसागरात बुडाले आहेत.