Take a fresh look at your lifestyle.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी सुशांतच्या बहिणीने लोकांना केले हे आवाहन

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या चौकशीत आज महत्त्वाचा दिवस असणार आहे. या प्रकरणात मुंबई पोलिस चौकशी करणार की सीबीआय चौकशी करणार यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल. या प्रकरणाच्या तपासावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. सुशांतची बहिण श्वेतासिंग कीर्ती यांनी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या या सुनावणीपूर्वी ट्वीट केले होते.

ट्विटमध्ये सुशांतच्या बहिणीने लिहिले आहे- मी सर्वांना सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर सकारात्मक निकालासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करते. यापूर्वी सुशांतच्या बहिणीने शिव तांडव यांचा एक मंत्र आणि फोटो शेअर केला आहे. सर्वांना ठाऊक आहे की सुशांत हा भगवान शिवभक्त होता.

सुशांतची बहीण श्वेता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. या प्रकरणात आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्यावर ती सतत प्रतिक्रिया व्यक्त करत असते. दुसरीकडे रिया चक्रवर्तीने तिच्याविरोधात पटना येथे दाखल केलेल्या एफआयआरविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बिहारमध्ये दाखल केलेला खटला मुंबईत ट्रान्स्फर करावा, असे रिया म्हणाली. एका खटल्याची दोन राज्यात चौकशी होऊ शकत नाही. सीबीआय चौकशीसाठी बिहार सरकारच्या शिफारशीला मंजुरी मिळाल्याबद्दल रियाने प्रश्न उपस्थित केले आहेत.

Comments are closed.