Take a fresh look at your lifestyle.

महागड्या वकिलांची फी कशी काय देतेस?? सुशांतच्या बहिणीचा रियाला सवाल

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणलं होत की मी यापुढे घराचे इएमआय कसे भरु अशी चिंता तिने व्यक्त केली होती. तिची ही मुलाखत पाहिल्यानंतर सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती संतापली आहे. इएमआय भरणं शक्य नाही,मग महागड्या वकिलांची फी कशी काय देतेस असा खोचक प्रश्न श्वेताने उपस्थित केला आहे.

रिया म्हणाली ,”मुंबईतील खारमध्ये माझं एक घर आहे. ते घर मी सुशांतला भेटण्यापूर्वीच घेतलं होतं. त्या घराचे ७४ लाख मी दिले आहेत. पण अजूनही माझ्यावर ५० लाखांचं कर्ज असून ते एचडीएफसी बॅकेतून घेतलं होतं. परंतु, सध्या या घरासंबंधित सगळी कागदपत्रे ईडीकडे आहेत. माझं पूर्ण आयुष्य उद्धवस्त झालं आहे. अशा परिस्थितीत मी महिन्याला १७ हजारांचा इएमआय कसा काय देऊ”, असं व्यक्तव्य रियाने केलं होतं. तिचं हे वक्तव्य ऐकल्यावर श्वेता प्रचंड संतापली आहे. श्वेताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रियाला सवाल केला आहे.screen

“१७ हजारांचा इएमआय कसा भरायचा याची तुला चिंता आहे???प्लीज मला एक गोष्ट सांग देशातल्या सगळ्यात महागड्या वकिलांना तू फी कशी काय देतेस? असा प्रश्न श्वेताने रियाला विचारला आहे.