Take a fresh look at your lifestyle.

सुशांतचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा खळबळजनक खुलासा ….

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिका चालकाने अतिशय खळबळजनक विधान केले आहे. विशाल बंदगर अस या चालकाच नाव असून गेल्या काही दिवसांपासून धमकी आणि द्वेषपूर्ण असे फोन येत आहेत अस तो म्हणाला.

हिंदुस्तान टाईम्सनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत विशाल बंदगर आणि त्यांचा भाऊ विविध रुग्णालयांसाठी रुग्णवाहिकेची सेवा पुरवतात. पण, सुशांतच्या प्रकरणापासून त्यांना धमकीचे फोन येऊ लागले. अर्वाच्च भाषेत फोनवरुन अनेक व्यक्ती त्यांना धमकावत असून, ज्यावेळी सुशांतला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आलं, तेव्हा त्याचे प्राण गेले नव्हते असं फोन करणारे वारंवार म्हणत असल्याची  माहिती या रुग्णवाहिका चालकांनी दिली.

सुशांतला आम्हीच मारल्याचा आरोप ही फोन करणारी मंडळी करत असून, परमेश्वर आपल्याला याची शिक्षा देईल असं फोन करणाऱ्यांकडून धमकावण्यात येत असल्याचा खळबळजनक खुलासा या रुग्णवाहिका चालकांनी केला. येत्या काळात धमक्यांचं हे सत्र थांबलं ऩाही, तर मात्र या रुग्णवाहिका चालकांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments are closed.