Take a fresh look at your lifestyle.

सुशांत आत्महत्या प्रकरण ; रिया चक्रवर्तीला ईडीने बजावले समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांना समन्स पाठविले आहे. शुक्रवारी रिया चक्रवर्ती यांना ईडीसमोर हजर व्हावे लागेल. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांना दिलेल्या एफआयआरमध्ये त्यांनी रियावर आरोप केले होते की रियाची नजर सुशांतच्या पैशांवर आहे आणि त्याच्या खात्यातून कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाली आहे.

सुशांतसिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये रिया चक्रवर्ती यांच्यावर आणखीन बरेच गंभीर आरोप झाले आहेत. सुशांतच्या वडिलांनी एफआयआर नोंदविल्यानंतर बिहार पोलिस आतापर्यंत या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता बिहार पोलिस पूर्णपणे या प्रकरणाच्या बाहेर झाले आहेत. बिहार पोलिसांना या प्रकरणाची चौकशी देण्यात आल्याबद्दल रिया चक्रवर्ती यांनी आक्षेप घेत म्हटले होते की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी.

मात्र, तपास सीबीआयच्या हाती लागल्यानंतर रियाच्या वकिलांनी त्याला पाठिंबा दर्शविला. सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की सीबीआय चौकशीसाठी केंद्र सरकारने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे.

Comments are closed.