Take a fresh look at your lifestyle.

सुशांत आत्महत्या प्रकरण ; कंगना रणौतने आदित्य ठाकरेंना विचारले हे ७ प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, या प्रकरणी अनेकजण फार निंदनीय राजकारण खेळत आहेत. या केसच्या माध्यमातून त्यांच्यावर आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबियांवर टीका केली जात आहे. पण याप्रकरणी ते धैर्याने या सर्व गोष्टींचा सामना करत आहेत. तसेच या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं आदित्यने स्पष्ट केलं. परंतु आता कंगना रणौतने आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत त्यांना काही प्रश्न विचारले आहेत.

कंगनाच्या डिजीटल टीमने आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, ‘पाहा.. निंदनीय राजकारणाबद्दल कोण बोलत आहे. तुमचे वडील मुख्यमंत्री कसे झाले ही पण गलिच्छ राजकारणाची केस स्टडी आहे. या सर्व गोष्टी जाऊ देत. तुम्ही वडिलांना सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी फक्त हे प्रश्न विचारा.. पहिला प्रश्न- रिया चक्रवर्ती कुठे आहे?’

कंगनाच्या टीमने दुसरं ट्वीट करत म्हटलं की, ‘मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल करून का घेतली नाही? तिसरा प्रश्न जेव्हा सुशांतच्या जीवाला धोका आहे यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात तक्रार करण्यात आली होती तर मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूदिवशीच त्या घटनेला आत्महत्या असं नाव का दिलं.?’

कंगनाच्या डिजीटल टीमने तिसरं ट्वीट करत म्हटलं की, ‘चौथा प्रश्न- आपल्याकडे सुशांतचे फॉरेन्सिक रिपोर्ट आणि फोन डेटा का नाहीये. यावरून मृत्यूच्या एक आठवड्याआधी तो कोणाकोणाशी बोलला ते कळू शकेल. पाचवा प्रश्न- बिहारचे आयपीएस विनय तिवारी यांना क्वारन्टीनच्या नावाखाली लॉक करून का ठेवलं आहे? सहावा प्रश्न- तुम्ही सीबीआय चौकशीला का घाबरत आहात? सातवा प्रश्न- रिया आणि तिच्या कुटुंबियांनी सुशांतचे पैसे का लुटले?’

Comments are closed.