Take a fresh look at your lifestyle.

सुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन फ्लॅट्स

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीने मुंबईत दोन फ्लॅट खरेदी केले होते. हे दोन्ही फ्लॅट खारमध्ये घेतले आहेत. याप्रकरणी ईडी चौकशी करणार असून ते लवकरच याविषयी रियाची चौकशी करणार आहेत,असं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

मुंबईतील खार या परिसरात अनेक श्रीमंत नागरिक राहत असून येथील जागेच्या आणि घराच्या किंमती प्रचंड आहेत. अशा ठिकाणी रियाने दोन फ्लॅट घेणं ही साऱ्यांसाठीच आश्चर्याची गोष्ट आहे. रियाने करिअरमध्ये फारसं यश मिळवलं नसतांना तिच्याकडे इतके पैसे आले कुठून हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता ईडी रियाची चौकशी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या तीन-चार वर्षांमध्ये सुशांतच्या खात्यातून जवळपास ५० कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आली होती. परंतु, या चार वर्षांच्या कालावधीत सुशांतने एकही घर किंवा अन्य कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली नव्हती. तर दुसरीकडे याच काळात रियाने बरिच प्रॉपर्टी खरेदी केली आहे. विशेष म्हणजे वर्षाला 15 ते 18 लाख रुपयांची कमाई करणारी रिया 1-2 वर्षांमध्ये कोटयवधी किंमतींचे फ्लॅट कसे काय घेऊ शकते हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Comments are closed.