Take a fresh look at your lifestyle.

महागड्या वकिलांना फी देण्यासाठी नक्की स्पॉन्सर कोण?; शेखर सुमन यांचा रियाला प्रश्न

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले असून या प्रकरणाचा तपास सीबीआयची  टीम करत आहे. सुशांतला  न्याय मिळावा अशी जोरदार मागणी त्याचे चाहते, कुटुंबीय आणि काही कलाकार करत आहेत. विशेष म्हणजे सुशांतने आत्महत्या केल्यापासून अभिनेता शेखर सुमन यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यात त्यांनी रिया चक्रवर्तीवर निशाणा साधत आहे. “महागड्या वकिलांना फी देण्यासाठी स्पॉन्सर कोण?” असा प्रश्न शेखर सुमन यांनी रिया ला विचारला आहे.

“जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम केलं असेल तर त्या व्यक्तीच्या निधनानंतर निदान काही काळासाठी तुम्ही त्याच्या कुटुंबीयांसोबत राहता. मात्र रियाने नेमकं त्याच्या उलट केलं तसंच रियाने तिची बाजू मांडण्यासाठी देशातील सर्वात महागड्या वकिलांची नियुक्ती केली आहे. जर तिचं वार्षिक उत्पन्नचं केवळ 14-15 लाख रुपये आहे, तर इतक्या महागड्या वकिलांना फी देणं तिला कसं काय शक्य आहे?? तिला नेमकं कोण स्पॉन्सर करतंय?”, असा प्रश्न शेखर सुमन यांनी विचारला आहे.

पुढे ते म्हणतात, “सीबीआय चांगल्या पध्दतीने तपास करत आहेत. त्यामुळे लवकरच सत्य समोर येईल. मी कोणावरही थेट आरोप करत नाहीये. पण अनेकांकडे संशयाची सुई जात आहे. कारण चौकशी दरम्यान प्रत्येकाचं स्टेटमेंट वेगवेगळं आलेलं आहे. सिद्धार्थ पिथानीपासून ते रुग्णवाहिका चालकापर्यंत प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. यात कोणाचीच वक्तव्य एकमेकांशी जुळत नाहीत.

सुशांतला न्याय मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. इतकंच नाही तर बॉलीवूड मधील  घराणेशाहीवरदेखील त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचं मत व्यक्त केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’