Take a fresh look at your lifestyle.

सुशांतला न्याय मिळवून देण्याच्या मोहिमेमध्ये सूरज पांचोलीही झाला सामील ; शेअर केली ‘ही’ पोस्ट

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी बॉलिवूड स्टारनी सोशल मीडियावर एक मोहिम सूरू केली आहे. कंगना राणावत, अंकिता लोखंडे यांनी व्हिडिओ शेअर करुण सुशांतला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. तर मौनी रॉय, वरुण धवन आणि कृती सॅनन यासारख्या कलाकारांनीही पोस्ट शेअर करत या केसची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. आता सूरज पांचोलीही या मोहिमेत सामिल झाला आहे.
सूरज पांजोलीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, ‘सीबीआय चौकशी करण्याचा सुशांतच्या कुटूंबाला सर्व हक्क आहे. हे लोक बर्‍याच काळापासून याकरिता लढा देत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण जगाला सुशांतचे काय झाले हे जाणून घेण्याचा अधिकार आहे.IMG_20200814_131933[1]

सुशांतसिंग राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियन यांच्या हत्येप्रकरणी सूरज पंचोलीचे नाव समोर आले आहे. परंतु सूरजने तेव्हा येवडच सांगितलं होते की तो सुशांतला फक्त एक अभिनेता म्हणून ओळखतो आणि ते दोघे कधीच एकमेकांना भेटले नाहीत. अलीकडेच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याच्यासोबत दिसणारी मुलगी दिशा सालियन असल्याचे सांगत आहे.

सुशांत सिंगच्या मृत्यूशी संबंध जोडून फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडियावर त्याची बदनामी केली जात असल्याचे सांगून सूरजने सोमवारी रात्री वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.