Take a fresh look at your lifestyle.

तब्बल १० वर्षांनंतर ‘ही’ अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये कमबॅक….

0

चंदेरी दुनिया । अभिनेत्री सुष्मिता सेन तब्बल १० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करते आहे. ही माहिती खुद्द तिनेच इंस्टाग्रामवर दिली आहे. बॉलिवूडमधून बराच काळ ब्रेक घेतल्यानंतर सुष्मिता सोशल मीडियावर सक्रीय असते. १० वर्षानंतर सुष्मिता बॉलिवूडमध्ये कमबॅक करत असली तरी ती कोणत्या चित्रपटात झळकणार आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

सुष्मिता सेन शेवटची बॉलिवूडमध्ये २०१० साली नो प्रॉब्लेम चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट अनीस बझ्मीने दिग्दर्शित केला होता. अनिल कपूर, संजय दत्त, कंगना राणावत आणि अक्षय खन्ना या सिनेमात लीड रोल साकारत होते. यानंतर ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही.

2015 मध्ये सुष्मिताने ‘निर्बाक’ या बंगाली सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जींनी केलं होतं. आता फक्त सुष्मिताने बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचं म्हटलंय. पण हा सिनेमा कोणता आणि कधी येणार याची काहीच माहिती मिळालेली नाही.

44 वर्षांची सुष्मिताने लग्न केलं नाही पण तिने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. रेनी ही सुष्मिताची पहिली दत्तक मुलगी असून 2000 साली दत्तक घेतलं आहे. तर 10 वर्षांनंतर 2010 साली तिने अलीसाला दत्तक घेतलं.

Leave A Reply

Your email address will not be published.