Take a fresh look at your lifestyle.

जो भी कहूँगा, सच कहूँगा! कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’चा सस्पेन्स-थ्रिलर ट्रेलर रिलीज; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट ‘धमाका’चा सस्पेन्स थ्रिलर ट्रेलर आता रिलीज झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असलेल्या कार्तिकच्या या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कार्तिक पत्रकार ‘अर्जुन पाठक’ हे पात्र साकारणार आहे. मुख्य म्हणजे तो पहिल्यांदाच असे हटके पात्र साकारताना दिसणार आहे. राम माधवानी दिग्दर्शित ‘धमाका’चा ट्रेलर आज मंगळवार, १९ऑक्टोबर २०२१रोजी रिलीज झाला आहे. ज्यामध्ये कार्तिकच्या युनिक लूकमुळे त्याचे चाहते अवाक झाले आहेत.

सांगायची विशेष बाब अशी कि, अभिनेता कार्तिक आर्यन बऱ्याच काळापासून रोमँटिक, कॉमेडी अश्या कथानकांमध्ये मुख्य पात्र साकारताना दिसला होता. पण आता ‘धमाका’च्या माध्यमातून तो आपल्या करिअरच्या आलेखात एक नवीन आयाम जोडत आहे. कार्तिकने यातील व्यक्तिरेखेखा उत्तमरीत्या वठविण्यासाठी जोरदार तयारी केली होती. ‘धमाका’ मध्ये, कार्तिक एक न्यूज अँकर आहे आणि त्याच्या रेडिओ शोवर एक भयानक कॉल येतो. इथून सुरु होतो थरार. या ट्रेलरने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि दिग्दर्शक राम माधवानी हे लवकरात लवकर चित्रपट रिलीज करू इच्छित आहेत. त्यामुळे आता लवकरच कार्तिक एका नव्या चित्रपटातून आपले मनोरंजन करणार यात काही शंकाच नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. कोरियन चित्रपट ‘द टेरर लाईव्ह’ या चित्रपटाचा हा अधिकृत रीमेक आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसह अभिनेत्री मृणाल ठाकूर, अमृता सुभाष आणि विश्वजित प्रधानदेखील इतर भूमिकेत दिसतील. धमाका चित्रपटाची निर्मिती राम माधवानी फिल्म्स, आरएसव्हीपी मूव्हीज, लोटी कल्चरवर्क्स, लायनगेट्स फिल्म्स आणि ग्लोबल गेट एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली करण्यात आली आहे.