Take a fresh look at your lifestyle.

‘तू तेव्हा तशी’! स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर रोमँटिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका लग्नाची दुसरी गोष्ट या अतिशय गाजलेल्या मालिकेनंतर झी मराठीवरील नव्या कोऱ्या मालिकेच्या माध्यमातून रोमँटिक हिरो स्वप्नील जोशी पुन्हा एकदा तब्बल १० वर्षांनी छोटा पडदा गाजवताना दिसणार आहे. तर ‘तुला पाहते रे’ या मालिकेमध्ये राजनंदिनीची लक्षवेधी भूमिका निभावल्यानंतर अभिनेत्री शिल्पा तुळसकर या मालिकेतून स्वप्नीलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. या मालिकेचे नाव ‘तू तेव्हा तशी’ असे आहे. हि मालिका झी मराठीवर प्रसारित होणार असून या मालिकेत स्वप्निल जोशी हा सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर अनामिका दीक्षितच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहेत.

प्रेम आणि प्रेमकथा म्हंटल कि मराठी इंडस्ट्रीतील पहिलं नाव आणि चेहरा जर कुणाचा समोर येत असेल तर तो म्हणजे रोमँटिक हिरो स्वप्नील जोशी. स्वप्नील गेल्या अनेक वर्षांपासून मालिका क्षेत्रापासून लांब आहे. पण आता लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मुख्य म्हणजे स्वप्नील जोशीसोबत या मालिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा टिझर प्रदर्शित झाला आहे. हा टिझर पाहून हि मालिका रोमँटिक आहे हे समजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

या प्रोजेक्टबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला, “चाळीशी पार केलेल्या सौरभ – अनामिकाची फ्रेश आणि युथफूल प्रेमकहाणी म्हणजेच “तू तेव्हा तशी”. प्रेम करायचं राहून गेलं असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी तर प्रेमात असणाऱ्यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढवणारी, अशी हि मालिका आहे. यावर्षी मी मालिका करणार असं मी ठरवलं होतं. मालिकांनी आणि टीव्ही माध्यमाच्या रसिक प्रेक्षकांनी आजवर मला भरभरून प्रेम दिलं आहे. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा येताना मी उत्सुक आहे.”

तर आपल्या नव्या मालिकेबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, “”तू तेव्हा तशी” ही गोष्ट आहे प्रेम व्यक्त करण्याचं राहून गेलेल्या सौरभ आणि अनामिकाची. सौरभला त्याचं प्रेम मिळणार की शेवटपर्यंत “प्रेम करायचं राहून गेलं” हीच भावना सौरभसोबत राहणार. या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना लवकरच या मालिकेतून मिळेल.”