Take a fresh look at your lifestyle.

मदर्स डे निमित्त स्वप्नील जोशीने आईसोबत बनविला शुभेच्छांचा व्हिडीओ; तुम्हीही पहा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजचा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज मे महिन्यातील दुसरा रविवार म्हणजेच जागतिक मातृदिन आहे. खरतर आईपणाची भावना हि जगातील कोणत्याही गोष्टींहून बहुमूल्य आहे. मात्र आईप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी जर आजचा एखादा खास दिवस मिळत असेल तर काय वाईट आहे. आयुष्यभर जिच्या ऋणातून सुटका नाही अश्या आईचा हा दिवस आहे. आज अनेक कलाकारांनी अनोख्या पद्धतीने आपापल्या आईंसह जगातील इतर सर्व मातांना व मातृत्वाच्या या भावनेला, जाणिवेला वंदन केले आहे. अभिनेता स्वप्नील जोशी याने आपल्या आईसह शुभेच्छांचा व्हिडीओ बनवीत शेअर केला आहे. या व्हिडिओत तो आपल्या आईसह दिसतोय आणि दोघे मिळून मातृदिनाच्या शुभेच्छा देत आहेत.

या व्हडिओत स्वप्नील व त्याची आई म्हणतेय , तुम्हाला सगळ्यांना मदर्स दे च्या खूप खूप खूप शुभेच्छा…! हा म्हणजे मदर्स दे खरतर फक्त आज नाही पाहिजे रोज पाहिजे ३६५ दिवस पाहिजे आयुष्यभर पाहिजे पण आपण आज साजरा करतोय तर आजचाहि दिवस का सोडा म्हणून आजपण मदर्स दे च्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येकाला वाटत कि त्याची किंवा तिची आई हि जगातली सगळ्यात भारी आई आहे आणि ती असतेच प्रत्येक आईची एक गोष्ट आहे प्रत्येक आईचा एक त्याग आहे घरासाठी प्रत्येक आईची एक वेगळी कहाणी आहे तर त्या सगळ्या आयांना आणि मदर्स डे च्या निमित्ताने जगातील प्रत्येक आईला आई या भावनेला मनापासून सलाम वंदन आणि मानाचा मुजरा! हैप्पी मदर्स डे.. !

आज जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून अनेक मराठी कलाकारांनी आपल्या आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. फक्त फोटो शेअर केले नाहीत तर त्यासोबत आपल्या आईचे मनापासून आभार मानले आहेत. या कलाकारांनी आपल्या आईसह जगातील सर्व मातांना तसेच आईपण या भावनेचा सन्मान करीत मातृदिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यात माधुरी दीक्षित- नेने, रुपाली भोसले, मयुरी देशमुख, क्रांती रेडकर, मिथिला पालकर, श्रेया बुगडे, राखी सावंत,उर्मिला निंबाळकर , सायली संजीव या मराठी अभिनेत्रीचा समावेश आहे. तर सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, शशांक केतकर, अद्वैत दादरकर या मराठमोळ्या अभिनेत्यांनीही चाहत्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.