Take a fresh look at your lifestyle.

कोणतीही मदत लहान-मोठी नाही; पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वरा भास्करने केले मदतीचे आवाहन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या परखड व्यक्तिमत्वामुळे ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने सध्या महाराष्ट्रात येऊन गेलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. याचसोबत तिने अन्य लोकांनाही मदतीचे आवाहन केले आहे. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत सर्वांना पूरग्रस्तांसाठी मदत करावी असे आवाहन केले आहे. यात तिने कोणतीही मदत लहान मोठी नसते असेही नमूद करत मदतीचे हात मागितले आहेत. तसेच महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या प्रत्येकाला तिने सलाम केला आहे.

संदर्भात स्वरा भास्कर म्हणाली, “महाराष्ट्रातील गरजू पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या सर्वांना सलाम. कोणतीही मदत लहान किंवा मोठी नाही आहे. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठं काम करणाऱ्या युथ फॉर डेमॉक्रसीला मदत करावी. कृपया दान करा.” याचसोबत स्वरा भास्करने आपल्या या ट्विटसोबत क्राऊड फंडिग जमा करणाऱ्या मिलाप या प्लॅटफॉर्मची एक लिंक शेअर केली आहे. याच्या माध्यमातून आपण पूरग्रस्तांसाठी मदत देऊ शकता. शिवाय यात युथ फॉर डेमॉक्रसीने सुरू केलेल्या मोहिमेची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत अनेको लोकांनी या मोहिमेचा भाग होत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणगी दिली आहे.

पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेत्या आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी देखील पाहणी केली होती. त्यांनीही लोकांना मदत करण्यासाठी आवाहन केले होते.

सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पूर तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अनेको युनिट, समाजसेवक आणि लहान मोठे संघ एकत्र येऊन त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. यातील एक यूथ फॉर डेमॉक्रसी यांनी म्हटले आहे, “आपल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त बांधवांसाठी आता आपण आपले बहुमोल योगदान ‘युथ फॉर डेमोक्रेसी’च्या माध्यमातून आमच्या अधिकृत खात्यावर जमा करू शकता. आपल्या मार्फत केल्या गेलेल्या सर्व योगदानाचे अपडेट्स YFD मार्फत १५ दिवसांच्या कालावधीत आमच्या सोशल मिडिया पेजवर पोस्ट केले जातील.”