Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Swara Bhaskar Net Worth: स्वरा भास्करच्या स्वप्नांचा मुंबई ते दिल्लीपर्यंत विस्तार; फ्लॉप सिनेमे देऊनही कमावलीये कोट्यवधींची संपत्ती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 9, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Swara Bhaskar Net Worth
0
SHARES
90
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Swara Bhaskar Net Worth) बॉलीवूड सिनेविश्वात नेहमीच विविध वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री स्वरा भास्कर आज तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करते आहे. खरतर अभिनेत्री असूनही स्वरा भास्कर तिच्या अभिनयापेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्य किंवा टीका टिप्पणींमुळे चर्चेत राहिली आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये ती तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे आणि जोडीदारामुळे चर्चेचा विषयी राहिली.

View this post on Instagram

A post shared by Fahad Ahmad (@fahadzirarahmad)

स्वरा भास्करने ६ जानेवारी रोजी समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदसोबत रजिस्टर लग्न केलं आणि अलीकडेच त्यांनी दिल्लीत तिच्या आजी- आजोबांच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम धुमधडाक्यात केले. ज्यामुळे दोघेही चांगलेच चर्चेत राहिले. लग्नानंतर स्वराची लाईफस्टाईल खूप बदलली असेल असे अनेकांनी अंदाज लावले. पण मुळात तीची लाईफस्टाईल आहे कशी हे आज आपण जाणून घेणार आहोत. इतकेच नव्हे तर तिच्या संपत्तीविषयीदेखील आपण जाणून घेऊ.

View this post on Instagram

A post shared by Priyanka Yadav (@prifreebee)

दिनांक ९ एप्रिल १९८८ रोजी स्वर भास्करचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिला असलेली अभिनयाची आवड तिला अभिनय क्षेत्राकडे घेऊन आली. स्वराने करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली मात्र मोठ्या पडद्यापर्यंत पोहचायला तिला फार वेळ लागला नाही. असे असूनही ती मोठा पडदा फार गाजवू शकलेली नाही. याउलट रुपेरी पडद्यापेक्षा तिने सोशल मीडियाचं जास्त गाजवला आहे. (Swara Bhaskar Net Worth)

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि जाणीवपूर्वक केलेल्या परखड वक्तव्यांसाठी स्वरा ओळखली जाते. आतापर्यंत तिने अगदी मोजके चित्रपट केले असले तरीही तिचा चाहता वर्ग मोठा आहे. स्वराचे बहुतेक चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. नुसते फ्लॉप नाही तर फ्लॉप पे फ्लॉप. असे असूनही स्वराने तिच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत सर्वांचे लक्ष वेधले जाईल इतकी संपत्ती कमावली आहे.

View this post on Instagram

A post shared by The Black Chair Studio by Sneha Joramie Rathi (@theblackchairstudio)

‘माधोलाल कीप वॉकिंग’ या चित्रपटातून स्वराने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र तिला खरी प्रसिद्ध मिळाली ती ‘तनु वेड्स मनू’ या चित्रपटातील भूमिकेमूळे. तिने आतापर्यंत २० पेक्षा जास्त सिनेमे केले असून यापैकी जवळपास सगळेच अयशस्वी ठरले आहेत. असे असूनही स्वरा भास्कर जवळपास ४० कोटींची मालकीण आहे. (Swara Bhaskar Net Worth) विश्वास बसत नाही ना..? पण हे खरं आहे. कारण स्वरा भास्कर एका सिनेमासाठी ४ ते ५ कोटी मानधन आकारते. शिवाय सोशल मीडिया प्रमोशन, ब्रॅण्ड एण्डॉर्समेंट, जाहिरातींचे शूट, मॉडेल शूट, इव्हेंन्स यामधूनही ती चांगली कमाई करते.

View this post on Instagram

A post shared by Chinmayi (@chinmayitripathi)

याशिवाय तिने प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत. अगदी मुंबई ते दिल्लीपर्यंत मेट्रो सिटींमध्ये स्वरा भास्करची स्वतःची मालकीची घरे आहेत. नुकतंच तिने मुंबईच्या घराचं बिग बजेट इंटिरियर करून घेतलं आहे. या इंटरियरसाठी तिने पाण्यासारखा पैसा ओतल्याचे म्हटले जात आहे. (Swara Bhaskar Net Worth) याशिवाय डिझायनर ड्रेस, हॅन्डबॅग्स, आऊटफिट, लोवर्स, शूज, हिल्सची ती भलतीच शौकीन आहे. यापेक्षा जास्त तर स्वरा महागड्या गाड्यांकडे जास्त आकर्षित होते. त्यामुळे तिचं गाड्यांचं कलेक्शन मोठं आहे. यामध्ये तिच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स १ ही गाडीसुद्धा आहे. या गाडीची किंमत जवळपास ४८ लाख रुपये इतकी आहे. असं साधारण घरं, गाड्या आणि इन्वेस्टमेंट मिळून स्वराची संपूर्ण मालमत्ता ४० कोटीच्या आसपास आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostNet WorthSwara BhaskarViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group