मला सर म्हणू नका, राहुल गांधींचा ‘हा’ व्हिडीओ शेअर करत स्वरा म्हणाली…
हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांच्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. दरम्यान, राहुल गांधी बुधवारी पाँडिचेरीला पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी कॉलेजच्या मुलांची भेट घेतली. दरम्यान तेथे उपस्थित असेलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना सर म्हणून आवाज दिला होता. त्यावर राहुल गांधींनी ‘माझे नाव सर नाही’ असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राहुल गांधींचा हा व्हिडीओ अभिनेत्री स्वरा भास्करने शेअर केला आहे.
जेव्हा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना सर म्हणून आवाज दिला होता. तेव्हा ते म्हणाले, ‘माझे नाव सर नाही. माझे नाव राहुल आहे. त्यामुळे मला राहुल या नावाने आवाज द्या. तुम्ही सर म्हणून तुमच्या शिक्षकांना आवाज द्या. मी राहुल आहे.’ राहुल गांधी यांचे उत्तर ऐकून विद्यार्थी आनंदी झाले.
Sweet ! 🙂 https://t.co/jsIzxao96R
— Swara Bhasker (@ReallySwara) February 17, 2021
राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हा व्हिडीओ रिट्विट करत अभिनेत्री स्वरा भास्करने ‘स्वीट’ असे म्हटले आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’