Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लेहंगा पाकिस्तानवाला!! स्वरा- फहादच्या लग्नाचं बरेलीत ग्रँड रिसेप्शन; थेट सीमेपलीकडून मागवला पेहराव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 20, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
0
SHARES
55
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही सध्या सोशल मिडियावर तिच्या लग्नामुळे फारच चर्चेत आहे. स्वरा भास्करने फहाद अहमद याच्यासोबत रजिस्टर लग्न केल्यानंतर अलीकडेच त्यांनी रितीरिवाजानुसार पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. स्वरा भास्करने दिल्लीत तिच्या आज्जीच्या घरी म्हणजेच आजोळी हळद, मेहंदी आणि संगीत असे लग्नाचे विधी पार पाडले.

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

यानंतर स्वरा- फहादने कव्वाली नाईट्स आणि भव्य रिसेप्शन पार्टीचेदेखील आयोजन केले होते. या सोहळ्याचे काही फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर दोघांनी बरेलीमध्ये एक भव्य दावत-ए-वलीमा दिला आणि यावेळी स्वराने चक्क पाकिस्तानातून मागवलेला लेहंगा परिधान केला होता.

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

या सोहळ्याचे देखील काही फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बरेलीमध्ये स्वरा आणि फहादने अतिशय भव्य स्वरूपात दावत-ए-वलीमाचे आयोजन केले होते. हा सोहळा अगदी नवाबी पद्धतीने पार पडल्याचे या व्हायरल फोटो आणि व्हिडिओतून समजत आहे. मात्र सोहळ्यापेक्षा जास्त चर्चा स्वराने परिधान केलेल्या लेहंग्याची होत आहे. या खास सोहळ्यात परिधान करण्याकरता स्वरासाठी खास पाकिस्तानी डिझायनरचा लेहेंगा ऑर्डर करण्यात आला होता. या लेहंग्यात स्वरा कमालीची सुंदर दिसत होती.

स्वराच्या या बेंज रंगाच्या लेहेंग्यावर एम्ब्रॉयडरी वर्कसह अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. स्वराने या लेहेंगामधील व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘भव्य @alixeeshantheatrestudio ची एक झलक. ज्यांनी हा लेहेंगा बनवला आहे. मला सीमेपलीकडून पाठवला आहे! हे पाठवल्याबद्दल @natrani चे खूप खूप आभार’. स्वराच्या या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

मुख्य म्हणजे या सीमेपलीकडून आलेल्या पेहरावाने विविध चर्चांना उधाण आले आहे. स्वरा- फहादने बरेलीतील आयोजित केलेले रिसेप्शन ‘द ग्रँड निर्वाणा रिसॉर्ट’मध्ये पार पडले. स्वराच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्यासाठी तिने परिधान केलेले पेहराव आणि तिचे लूक सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Tags: Bollywood ActressGrand WeddingInstagram StorySwara Bhaskarviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group