Take a fresh look at your lifestyle.

डॉ. अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुंबई : खासदार अमोल कोल्हे यांची झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे . आता त्यांची नवी मालिका स्वराज्यजननी जिजामाता येत्या १९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबतची माहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. या मालिकेची निर्मिती जगदंब क्रिएशनच करणार असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली .

शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली, आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाई मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर मालिकेच्या स्वरूपात लवकरच येणार आहे . ही नवी मालिका सोनी मराठीवर प्रसारित करण्यात येईल . ही मालिका तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाची हुंकार असेल,’ अशी पोस्ट अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर लिहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.