Take a fresh look at your lifestyle.

हॉट ब्लु जलपरी! तमन्ना भाटियाच्या लुकवर भाळले नेटकरी; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथ सिनेइंडस्ट्रीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला चाहता वर्ग निर्माण करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया नेहमीच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करताना दिसते. शिवाय तमन्ना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळे ती नेहमीच वेगवेगळ्या आऊटफिटमधील लूक शेअर करणे पसंत करते. सोशल मीडियावरील तीच फॅन फॉलोईंग मोठं असल्यामुळे तिचा एकही लूक वाया जात नाही. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते मोठ्या संख्येने लाईक आणि अनेक कमेंट्स करताना दिसतात. सध्या तमन्नाचा निळया रंगाचा लेदर आउटफीट कमाल चर्चेत आहे. या फोटोंची सोशल मीडियावर नुसती चर्चा रंगली आहे. दरम्यान आपले हॉट फोटो तमन्नाने स्वतःच शेअर केले केले आहेत.

अभिनेत्री तमन्ना भाटिया या फोटोमध्ये निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसतेय. तिने परिधान केलेला हा निळ्या रंगाचा आऊटफिट लेदर आऊटफिट असून यात ती किलर दिसतेय. तिच्या ग्लॅमरस लूकला या आऊटफिटने आणखीच खुलवले आहे. तर आऊटफिटचे सौंदर्य तमन्नाच्या सौंदर्याने बहरले आहे.

या फोटोंमध्ये तमन्नाने फक्त लेदर मिडी ड्रेसच नव्हे तर त्याला साजेशा हाय हिल्सदेखील परिधान केल्या आहेत. त्यामुळे तिचा लूक फारच ट्रेंडी, हटके आणि लक्षवेधी वाटतो आहे. शिवाय या लूकमध्ये तिने अनेक आकर्षक पोझ देत फोटोशूट केले आहे आणि हेच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिने शेअर केलेल्या फोटोसह तिने कॅप्शनमध्ये हॅशटॅग ‘जी कर्दा’ असे लिहिले आहे. ‘जी कर्दा’ हि तमन्नाची आगामी वेब सिरीज आहे. जी अमॅझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. यामध्ये सात मित्र मैत्रिणींची गोष्ट असून हे कथानक अत्यंत आकर्षकरित्या चित्रित केले आहे. या सात बालपणीच्या अत्यंत जवळच्या मित्रांच्या आयुष्यात बऱ्याच उलाढाली होतात.

प्रौढावस्थेतून मार्ग काढण्याचा जो तो प्रयत्न करतोय आणि जगतोय. असे काहीसे हे कथानक आहे. यामध्ये तमन्ना भाटियासह सुहेल नय्यर, आशिम गुलाटी, अन्या सिंग, हुसैन दलाल, संवेदना सुवाल्का आणि सायन बॅनर्जी या कलाकारांचा सहभाग आहे. तर ‘जी कर्दा’ ही मॅडॉक फिल्म्सची निर्मिती आहे.