Take a fresh look at your lifestyle.

जमिनीवर कोसळली आणि..; अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन सृष्टीमधून मनाला चटका लावणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना समोर आली आहे. अभिनेत्री उमा माहेश्वरी हिचं वयाच्या ४० व्या वर्षी रविवारी अचानक निधन झालं. मृत्यूच्या काही मिनिटं अगोदर ती जमिनीवर कोसळली होती आणि यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं. तिच्या मृत्यूच्या वृत्ताला तिची सहकलाकार अभिनेत्री गायत्री शास्त्रीने सोशल मीडियाद्वारे दुजोरा दिला आहे.

तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. तथापि, काही सूत्रांनी सांगितल्यानुसार, ती गेल्या काही महिन्यांपासून आजाराशी झुंज देत होती. तर गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी उमाला उलट्या झाल्या आणि ती जमिनीवर कोसळल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. तिचे चाहते अजूनही मोठ्या धक्क्यात आहेत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शोक व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमा माहेश्वरीला रविवारी सकाळपासूनच खूप अस्वस्थ जाणवत होतं. पण तिला काय होतंय कळण्याआधीच उलट्या करताना ती जमिनीवर कोसळली आणि तिने अखेरचा श्वास घेतला. तामिळ टीव्ही शो मेट्टी ओलीमध्ये टोईच्या आईची भूमिका साकारणाऱ्या शांति विलियम्स या अभिनेत्रीने घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. शांतीने उमाच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले, उमा माहेश्वरी माझ्या मुलीसारखी होती. तिच्या मृत्यूच्या बातमीनं मला धक्का बसला. देव इतक्या कमी वयात लोकांना का घेऊन जातो माहित नाही. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा अनेकदा देवाच्या अस्तित्वावर संशय येतो.

पुढे, अभिनेत्री चित्रा वीजे काही महिन्यापूर्वी आम्हाला सोडून गेली. ती घटना विसरत नाही तोवर अचानक उमा माहेश्वरीही आमच्यातून निघून गेली. उमा मागील काही महिन्यापासून कावीळ या आजाराने पीडित होती असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. त्यामूळे तिच्यावर उपचारदेखील सुरू होते. परंतु अलीकडेच ती पूर्णपणे बरी होऊन घरी परतली होती. उमा माहेश्वरी आपल्यात नाही यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. उमा माहेश्वरीच्या निधनावर अनेक सेलेब्रिटी सोशल मीडियावरुन तिला श्रद्धांजली वाहताना आणि तिच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त करताना दिसत आहेत.