Take a fresh look at your lifestyle.

तमिळ कॉमिक अभिनेता नेल्लई शिवा यांचे हृदय विकारामूळे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने कहर केला आहे. यामुळे जिथे तिथे मृत्यूचे भयानक तांडव सुरु आहे. दरम्यान केवळ कोरोना नव्हे तर इतरही रोग बळावले आहेत. लोकांच्या दैनंदिन जीवनात अचानक बदल झाल्यामुळे हृदय विकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहेत. इतकेच नव्हे तर या दरम्यान हदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या सेलिब्रेटींची संख्या जास्त आहे. नुकतेच तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द कॉमेडियन नेल्लई शिवा यांचेदेखील हदयविकाराने निधन झाले आहे. यावेळी ते ६९ वर्षांचे होते. तिरुनवेली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

तामिळ कॉमिक अभिनेता नेल्लई शिवा ह्यांचे तिरुनवेली येथील पानाकुडी येथे त्यांचे राहते घर आहे. हदयविकाराचा झटका आला तेव्हा ते घरीच होते. याच दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. ते अविवाहीत होते. नेल्लई यांच्या जाण्याने तामिळ चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.

अभिनेता नेल्लई शिवा यांनी ‘आन पावम’ या चित्रपटाच्या माध्यमातून तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रवेश केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडियाराजन यांनी केले होते. त्यानंतर अंबे शिवम, महाप्रभु, वेत्री कोडी कट्टू आणि कन्नुम यांसारख्या विविध चित्रपटांमध्ये नेल्लई यांनी अभिनय केला होता. त्यांनी ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिकांसहित अव्वल दर्जाचे काम केले होते. कॉलीवूडमध्ये त्यांचे बहुसंख्य फॅन्स आहेत. त्यांच्या नावाचा सिने इंडस्ट्रीमध्ये चांगलाच दबदबा होता.