Take a fresh look at your lifestyle.

‘तान्हाजी’ आणि ‘छपाक’ उद्या प्रेक्षकांच्या भेटीला ; कोणता चित्रपट ठरणार हिट ?

बॉलीवूड कट्टा । सध्या बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या विषयाला हात घालणारी कथानक हातात घेऊन मोठ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक, गल्ली बॉय, ड्रिमगर्ल, मर्दानी २, केसरी, बाला, आर्टिकल ३७५ या सारख्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. चित्रपट क्षेत्रात आता स्क्रिप्टवर भर दिला जातो. चित्रपट चाहते देखील स्क्रिप्टचा विचार करूनच चित्रपट पाहायला जातात.

या वर्षीही चित्रपटांची अशीच भर असणार आहे. हे चित्रपट देखील वेगवेगळ्या विषयांना मांडणारे असणार आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एकाच दिवशी मोठी स्टारकास्ट असलेले दोन चित्रपट रिलीज होत आहेत. यात अजय देवगणचा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ तर दुसरीकडे दीपिकाचा ‘छपाक’ आहे. दोन्ही चित्रपट हे बायोपिक श्रेणीतच मोडतात.

https://www.instagram.com/p/B7EACupp0oj/?utm_source=ig_web_copy_link

ऐतिहासिक क्षणांना उजाळा देणारा ‘तान्हाजी:द अनसंग वॉरियर’ की स्वतःच्या आयुष्यातील दुःखद क्षणातून सावरलेल्या व्यक्तिरेखेवर आधारित ‘छपाक’.

तान्हाजी चित्रपटात ‘तानाजी मालुसरे’ यांची व्यक्तिरेखा अजय देवगण यांनी साकारली आहे. तर छपाकमध्ये असिड हल्ल्यात जखमी झालेली ‘लक्ष्मी अग्रवाल’ या तरुणीची जीवनगाथा आहे. जिने जिद्दीने आपल्या आयुष्य परत पुन्हा सारखे जगण्यासाठी केलेला संघर्ष दर्शवला आहे.

सध्या ट्विटरवर #बॉयकॉटछपाक हा ट्रेंड सुरु आहे. दीपिका पदुकोणचा जे एन यू मधील विद्यार्थ्यांना दिलेल्या सपोर्टमुळे एक नवीन वादळ सुरु झाले आहे. काही लोकांनी दीपिकाचा हा निर्णय योग्य आहे आम्ही दीपिकाच्या सोबत आहोत तर काही लोक हे चित्रपट बघण्याला विरोध देत आहेत. काही लोकांनी चित्रपटाची तिकीट देखील रद्द केली आहेत.

चित्रपट चाहते कोणता चित्रपट बघायला चित्रपटगृहात गर्दी करणार हे बघणे मनोरंजक ठरणार आहे. तर तुमची पसंती कोणत्या चित्रपटाला आहे. तुम्ही कोणता चित्रपट या आठवड्यात बघणार आहात?

Comments are closed.

%d bloggers like this: