Take a fresh look at your lifestyle.

तान्हाजी चित्रपटातील पाहिलं गाणं रिलीज : ‘शंकरा रे शंकरा’

0

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन | मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या तान्हाजी – द अनसंग वॉरिअर या चित्रपटामधील पहिले गाणे आज प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात सुरुवातीलाच ‘दुश्मन को हराने से पहले दुश्मन को देखना चाहता हूं’ हा डायलॉग टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. ‘शंकरा रे शंकरा’ असे या गाण्याचे बोल असून अभिनेता अजय देवगनने इंस्टाग्रामवर हे गाणं प्रदर्शित केले आहे. तसेच युट्युबवर देखील हे गाणे पहावयास मिळत आहे.

तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत असलेला अजय देवगन या गाण्यात उदयभान साकारत असलेल्या सैफ अली खानच्या समोर हे गाणं सुरू आहे. या गाण्यात अजय आणि सैफ अली खान पावरफुल लूकमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे बऱ्याच दिवसातून अभिनेता अजय देवगन या गाण्यामध्ये नृत्य करताना दिसत आहे. शेकडो मावळ्यांच्या सोबत अजय देवगण या गाण्यामध्ये नृत्य करत आहे.


दरम्यान अजय देवगनचा हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे. ‘तान्हाजी’ हा अजय देवगनच्या करिअरमधील 100 वा सिनेमा आहे. तसेच अजय देवगनच्या तान्हाजी सिनेमात अनेक मराठी कलाकार देखील दिसणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: