Take a fresh look at your lifestyle.

अस्सल मराठी साजाने नटलेलं, ‘तान्हाजी’तील ‘माय भवानी’ गाणं !

0

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन । ‘तान्हाजी’ चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्टारकास्ट, बजेट, सिनेमॅटोग्राफी, ऍक्शन आणि संगीत या सर्वांमुळे चित्रपट चर्चेत असतानाच, या चित्रपटातलं दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘माय भवानी’ असे या गाण्याचे बोल असून यात अभिनेता अजय देवगण आणि काजोलने ठेका धरला आहे.

होळीच्या प्रसंगी, रात्रीच्या वेळी, मशालींच्या उजेडात हे गाणं चित्रित झालेलं हे गाणं, पडद्यावर सुंदर दिसत आहे. ‘माय भवानी’ या गाण्यामध्ये भवानी मातेचं महात्म्य सांगितलं असून तिचं कौतुक केलं आहे. तसंच देवीच्या स्तुतीमध्ये तान्हाजी,त्यांच्या पत्नी आणि सारेच मावळे रंगून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे या गाण्यात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेची देखील झळकला आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर भव्यदिव्य स्वरुपात पाहायला मिळणार आहे. यामध्ये अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: