Take a fresh look at your lifestyle.

नानांसारख्या व्यक्तीला निर्माते काम कसं देऊ शकतात? ; तनुश्री दत्ताची पुन्हा नानांवर आगपाखड

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | गेल्या दोन वर्षांपासून me too अंतर्गत लैंगिक छळाच्या आरोपाखाली असलेले अभिनेते नाना पाटेकर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत. फिरोज नाडियाडवाला यांच्या आगामी वेब सीरिजमध्ये नाना अभिनय करताना दिसतील अशी चर्चा आहे. मात्र त्यांच्या या पुनरागमनावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने संताप व्यक्त केला आहे. नानांसारख्या व्यक्तीला निर्माते काम कसं देऊ शकतात? असा सवाल तिने केला आहे.

तनुश्री एका मनोरंजन पोर्टलशी संवाद साधताना म्हणाल्या – माझे शोषण आणि माझा छळ करणे, मला धमकावणे, माझ्यावर आणि माझ्या कुटूंबावर हल्ला करणे, माझ्या घरी गुंड पाठविणे, माझे करिअर आणि जीवन उध्वस्त करणे एवढ्या गोष्टी करूनही अशा लोकांच्या पाठीशी मोठे प्रोड्युसर कसे काय उभं राहतात असा सवाल तनुश्रीने केला आहे.

मुलाखती दरम्यान तनुश्री म्हणाली, “माझा कोणताही दोष नसताना मला 12 वर्षे बॉलीवूडपासून दूर रहावे लागले आणि लोक सुशांतसिंग राजपूत यांना न्यायाची मागणी करीत आहेत.” मला न्याय कुठे आहे? कृपया हे होऊ देऊ नका. मी परत येण्यासाठी धडपडत असताना या लोकांना पुन्हा काम करण्याची संधी देऊ नका.

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत लैंगिक गैरवर्तणुक केली होती, असा आरोप तनुश्री दत्ता हिने केला आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने त्या प्रकरणाचा उल्लेख पुन्हा एका नाना पाटेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’