Take a fresh look at your lifestyle.

‘मिथाली राज’चा बायोपिक ‘शाब्बास मिथू’मध्ये झळकणार तापसी पन्नू

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मेरी कोम, मिल्खा सिंग, महेंद्रसिंह धोनी, संजय दत्त, सनी लिओनी असे एक ना अनेक व्यक्तींच्या जीवनावर बायोपिकचित्रपट आले आणि या चित्रपटांनी चांगलीच वाहवाह मिळवली आहे. या प्रत्येक सिनेमातून त्या त्या व्यक्तीचा जीवन संघर्ष रुपेरी पडद्यावर दाखविण्यात आला आहे. यानंतर आता आणखी एक बहुप्रतिक्षित बायोपिक रसिकांच्या भेटीला येत आहे.

भारतीय महिला वन डे आणि टेस्ट क्रिकेट संघांची कर्णधार मिथाली राजच्या जीवनावरील सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘शाब्बास मिथू’ असे या सिनेमाचे नाव असणार आहे. तर या चित्रपटात तापसी पन्नू मिथाली राजच्या भूमिकेत दिसेल.

हा बायोपिक ५ फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर लॉन्च झालं आहे. यात तापसी पन्नू मिथालीच्या भूमिकेला न्याय देईल. एखादा स्पोर्ट्सपर्सन बालपणापासून मेहनत घेत असतो. यानंतर अनेक वर्षे मेहनत घेतल्यानंतर तो त्या खेळात प्राविण्य मिळवतो आणि यश संपादन करतो. या सगळ्या गोष्टी रुपेरी पडद्यावर दाखवण्यासाठी तापसी स्वतःला तयार करतेय. तापसीने ‘दोबारा’ सिनेमाचं शूट पूर्ण केल्यानंतर या सिनेमासाठी ती तयारी करत होती. यासाठी ती क्रिकेटची प्रॅक्टिस करत होती. दरम्यान तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

तापसीने विविध भूमिका साकारत मनोरंजन इंडस्ट्रीत आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. याआधीच्या तिने निभावल्या प्रत्येक भूमिकांना रसिकांनी पसंती दिली आहे. यांपैकी ‘ थप्पड’, ‘बदला’, ‘पिंक’, ‘ सांड की आंख’, ‘नाम शबाना’ अश्या अनेक धमाकेदार सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची रसिकांवर छाप पाडली होती. यानंतर आता मिथाली राज’च्या ‘शाब्बास मिथू’ या बायोपिक सिनेमातूनही तापसी पुन्हा एकदा स्वःला सिद्ध करताना दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडेसुद्धा झळकणार आहे. खेळाडूप्रमाणे फिट दिसण्यासाठी तिनेही आपल्या फिटनेसवर बरेच कष्ट घेतले आहेत.